भाजपा गडचिरोली शहर अध्यक्षपदी अनिल कुनघाडकर तर तालुका अध्यक्षपदी दत्तु सुत्रपवार यांची निवड

भाजपा गडचिरोली शहर अध्यक्षपदी अनिल कुनघाडकर तर तालुका अध्यक्षपदी दत्तु सुत्रपवार यांची निवड

✍️लुकेश कुकडकर✍️
गडचिरोली तालुका प्रतिनिधी
मो 8999904994

गडचिरोली : भारतीय जनता पार्टी गडचिरोलीच्या तालुका व शहर अध्यक्षपदासाठी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांची घोषणा आज दिं.२० एप्रिल २०२५ ला गडचिरोली येथे करण्यात आली. ही घोषणा आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांच्या कर्तव्य कक्षातील जनसंपर्क कार्यालयात करण्यात आली. प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत ही निवड घोषणा प्रक्रिया पार पडली.

भाजपा गडचिरोली तालुकाध्यक्षपदी दत्तु तुकाराम सुत्रपवार तर शहराध्यक्षपदी अनिल पांडुरंग कुनघाडकर यांची अधिकृत निवड करण्यात आली. पक्षाच्या नेतृत्वाने त्यांच्या कार्यक्षमतेवर विश्वास दाखवित ही जबाबदारी त्यांच्यावर सोपवली.

या प्रसंगी अनेक मान्यवर पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांमध्ये पुढील प्रमुखांचे समावेश होता:

माजी खासदार तथा भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ. अशोकजी नेते,भाजपा जिल्हाध्यक्ष प्रशांतजी वाघरे,आमदार डॉ. मिलिंदजी नरोटे,निवडणूक प्रक्रिया प्रमुख व जिल्हा महामंत्री सदानंदजी कुथे,सह-निवडणूक प्रमुख अँड. चाटे साहेब,कि.मो. प्रदेश सचिव रमेशजी भुरसे, जिल्हा महामंत्री प्रकाशजी गेडाम,जिल्हा महामंत्री गोविंदजी सारडा,जिल्हा महामंत्री योगिता पिपरे,जिल्हा उपाध्यक्ष डॉ. भारत खटी,जेष्ठ नेते तथा जिल्हा उपाध्यक्ष सुधाकरजघ येनंदलवार,महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा गीताताई हिंगे, भाजयुमो जिल्हाध्यक्ष अनिल तिडके,ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष अनिल पोहनकर,
जिल्हा सचिव वर्षा शेडमाके, माजी तालुकाध्यक्ष विलास पा. भांडेकर,माजी शहराध्यक्ष मुक्तेश्वर काटवे,इतर मान्यवर कार्यकर्ते: विनोद देवोजवार, किर्तीकुमार मासुरकर,निखिल सुंदरकर आदी कार्यक्रमात नवनिर्वाचित अध्यक्षांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. भाजपाच्या कार्यालयासमोर फटाक्यांची आतषबाजी, मिठाई व पेढ्यांचे वाटप तसेच पुष्पगुच्छ व भाजपाचा दुपट्टा देऊन त्यांचे अभिनंदन करण्यात आले.

या निवडीमुळे गडचिरोली तालुका व शहरातील भाजपा संघटनात्मक बळकटीला नवे बळ मिळणार असल्याचे मत अनेक कार्यकर्त्यांनी व्यक्त केले.