हरिहरेश्वर पर्यटन विकास संस्थेच्या वतीने श्री कयापाक पोलीस शिपाई यांचा सत्कार समारंभ
✍️सचिन मापुस्कर✍️
श्रीवर्धन तालुका प्रतिनिधी
📞8698536457📞
श्रीवर्धन :- आज दिनांक २० एप्रिल २०२५ रोजी हरिहरेश्वर पर्यटन विकास संस्थेच्या वतीने श्री कयापाक पोलिस शिपाई यांचा शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. श्री कयापाक हे SRPF या विभागातून बदली होऊन श्रीवर्धन पोलीस ठाण्यात आलेले आहेत. दि २८ डिसेंबर २०२४ दिवशी बदली होऊन श्रीवर्धन येथे आले असता हरिहरेश्वर येथे त्यांची ड्यूटी लावण्यात आली. हि व्यक्ती सकाळी साधारण ८ ते ९ वाजता आपल्याला दिलेल्या जागेवर हजर झाले त्या दिवशी हरिहरेश्वर येथे प्रचंड प्रमाणात भाविक पर्यटक आलेले होते. अशा गर्दीचे वेळेत आलेल्या सर्वांनाच योग्य प्रकारे सूचना, माहिती देऊन मार्गदर्शन करत होते. मार्गदर्शन करत असताना दमदाटी किंवा आरडाओरडा अजिबातच नाही. सर्वांना मार्गदर्शन करताना आपलेच गाव असल्या प्रमाणे भावना त्यांच्या वागणुकीतून झळकत होती. सकाळी हजर झालेली ही व्यक्ती चक्क रात्री ९ वाजेपर्यंत कार्यरत होती. उत्तम प्रकारे वाहतूकीचे नियंत्रण आणि नियोजन त्याच प्रमाणे संवाद कौशल्याचे दर्शन ह्या व्यक्तीकडून पहायला मिळाले, अशा व्यक्तीचे आभार आपण मानले पाहिजे व त्या माणसाच्या प्रामाणिकपणे कर्तव्यदक्ष कामाचे कौतुक केले पाहिजे या भावनेमुळे श्री कयापाक दादांचा छोटेखानी सत्कार संस्थेचे वतीने मा अध्यक्ष ओमप्रकाश कोलथरकर, श्री राजेश शेट्ये, श्री ग्रीसिन साखळे, श्री वैभव जोशी व श्री सिद्धेश पोवार यांचे उपस्थित करण्यात आला.