रायगड जिल्ह्यात भाजपा च्या 17 पैकी 12 मंडळ अध्यक्षांच्या नियुक्तया
रत्नाकर पाटील
रायगड ब्यूरो चीफ
९४२०३२५९९३
अलिबाग:- स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून भाजपचा पक्ष संघटनेवर भर देत असून
जनाधारावर आधारित शक्ती वाढवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे.
भारतीय जनता पार्टीच्या महाराष्ट्र प्रदेश संघटनेत एक महत्त्वाचा टप्पा पार पडला आहे. राज्यभरात एकूण1221 मंडळ स्थापन करण्यात आले आहेत. त्यापैकी 963 मंडळ अध्यक्षांची नियुक्ती करण्यात आली आहे. भाजपा दक्षिण रायगड जिल्हयातील एकुण 17 पैकी 12 मंडल अध्यक्षांच्या नियुक्तया झाल्याचे जिल्हाध्यक्ष तथा खासदार धैर्यशिल पाटील यांनी आज रविवार दिनांक 20 एपिल, 2025 रोजी जाहिर केले आहे.या संपूर्ण नियुक्त्या केवळ आकडेवारी नाही, तर पक्षाची जनाधारावर आधारित शक्ती वाढवण्याचा प्रयत्न आहे. यातून भाजपच्या कार्यपद्धतीतील शिस्त, संघटन आणि वेळेचं भान प्रकर्षानं अधोरेखित होते.
भाजपचे कार्याध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली ही प्रक्रिया अत्यंत नियोजनबद्ध आणि प्रभावी पद्धतीनं पूर्ण झाली आहे. “संघटन हेच खरे बळ” या तत्त्वावर चालत, भाजपनं आता महाराष्ट्रात मजबूत गड उभारण्याची तयारी सुरू केली आहे. मंडळ गठीत करण्यात आले आहेत.
भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून जनसेवेचे अपूर्व योगदान नवनिर्वाचित मंडल अध्यक्षांकडून होवो या शुभेच्छा खासदार पाटील यांनी नियुक्तीपत्राव्दारे दिलेल्या आहेत.
भाजपा दक्षिण रायगड जिल्हयातील एकुण १७ पैकी १२ मंडल अध्यक्षांच्या नियुक्तया झालेल्या आहेत.
त्या मध्ये महाड दक्षिण निलेश तळवटकर, महाड उत्तर निलेश देवगिरकर, निजामपूर युवराज मुंडे, मुरुड शैलेश काते, म्हसळा महेश पाटील, तळा रितेश रवींद्र मुंडे, माणगाव परेश सांगळे, रोहा अमित घाग, पेण संजय डंगर, सुधागड श्रीकांत ठोंबरे, हमरापुर विजय भानुदास पाटील, नागोठणे महेश ठाकूर या
तरुणांना संधी दिल्यामुळे जिल्हयातील कार्यकत्यांनी फटाक्यांची आतिशबाजी करुन मिठाई वाटुन आनंद व्यक्त केला. सर्व नवनिर्वाचित मंडल अध्यक्षांनी भाजपा जेष्ठ नेते गिरीश तुळपुळे, रायगड लोकसभा प्रमुख सतीश धारप, जिल्हा सरचिटणीस महेश मोहिते, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष निलेश थोरे, जिल्हा उपाध्यक्ष वैकुंठ पाटील, सोपान जांबेकर, मंगेश दळवी, सुनिल दामले, यांच्या प्रमुख उपस्थितीत अलिबाग येथील भाजप कार्यालयात पत्रकार परिषद घेऊन पक्षाचे आभार व्यक्त केले. यावेळी सतीश धारप यांनी नवनिर्वाचित मंडळ अध्यक्षांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा आणि मार्गदर्शन केले.