गोरेगांव पश्चिम मधे अवैध ऑनलाईन मटक्या चे धंद्दे सर्रास चालू,,

गोरेगांव पश्चिम मधे अवैध ऑनलाईन मटक्या चे धंद्दे सर्रास चालू,,

गृहमंत्र्यांना निवेदनातून संपूर्ण देणार माहिती सामाजिक कार्यकर्ते पप्पू नायर

✍️ पप्पू वि नायर ✍️
मुंबई शहर प्रतिनिधी
मो :- 7304654862

मुंबई :- गोरेगांव पश्चिम मधे राजरोस अवैध मटक्याचे ऑनलाईन धंद्दे चालू असल्याचे निदर्शनास आले आहे, त्यावर पोलीस प्रशासनाची भूमिका अद्याप अस्पष्ट असल्याची कळते. सदर मटक्याचे धंद्दे गोरेगांव एम जी रोड व बांगूर नगर मेट्रो स्टेशन च्या खाली दुकानाना लाल पडदे लावून चालवले जातात. सदर मटके वाल्याना अभय कोणाचा आहे हे लवकरात समोर येईल असे सामाजिक कार्यकर्ते व स्थानिक पत्रकार पप्पू नायर यांनी दिली.

गोरेगांव मधील सर्वसामान्य जनता महिनाभर कष्ट करून महिन्याचा पूर्ण पगार जास्त पैसे मिळतील अशा अपेक्षेने मटका खेळतात व सर्व पैसे गमावून बसतात, त्यांच्या कुटुंबाची सध्याची स्थिती पाहता याला जवाबदार कोण असा प्रश्न सर्व जन- माणसात निर्माण होतं आहे. मटका खेळणाऱ्यांची आर्थिक परिस्थिती खूप वाईट झालेली असून सुद्धा ते लाळसे पोटी मटक्याच्या आहारी जाताना पहावयास मिळते.

मटके वाल्याना मटका चालवण्याचा अधिकृत परवाना कुणी दिला, याचा आता शोध घेण्याची गरज उदभवली आहे. सदर मटकेवाल्यांची संपूर्ण माहिती व सढळ पुरावे घेऊन महाराष्ट्राचे गृहमंत्री – देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपूर्द करून कारवाईची मांगणी करण्यात येणार आहे. असे पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते श्री, पप्पू नायर यांनी माध्यमाना बोलताना दिली.