जिल्हाधिकारी यवतमाळ यांची हंसराज अहीर यांनी भेट घेवून कोरोना उपाययोजना संबंधी चर्चा केली.

50

जिल्हाधिकारी यवतमाळ यांची हंसराज अहीर यांनी भेट घेवून कोरोना उपाययोजना संबंधी चर्चा केली.

जिल्हाधिकारी यवतमाळ यांची हंसराज अहीर यांनी भेट घेवून कोरोना उपाययोजना संबंधी चर्चा केली.
जिल्हाधिकारी यवतमाळ यांची हंसराज अहीर यांनी भेट घेवून कोरोना उपाययोजना संबंधी चर्चा केली.

✒️मनोज खोब्रागडे✒️
पूर्व विदर्भ ब्युरो चीफ प्रतिनिधी
यवतमाळः- पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री हेसराज अहीर यांनी दि. 17 मे 2021 ला घाटंजी, पांढरकवडा येथील कोविड CCC व DCHC सेंटर ला भेट दिल्यानंतर यवतमाळ जिल्हाधिकारी कार्यालय येथे जिल्हाधिकरी यांची संध्याकाळी भेट घेतली. यावेळी पांढरकवडा येथे DCHC सेंटर च्या कामाबद्दल फार समाधान व्यक्त करतांना तिथे पूढील संकेत पाहता बालरोग हाॅस्पीटल CCC सेंटर अधिग्रहन करावे. घाटंजी व आर्णी येथील ग्रामिण रूग्णालयात लवकर DCHC सेंटर सुरू करण्याची गरज आहे. पूढे प्रत्येक ग्रामिण रूग्णालयात संक्रमित रूग्णांचा उपचार होईल ही गरज आहे आणि त्यासोबत प्रत्येक तालुक्यात चांगल्या इमारती असतील अषा प्राथमिक आरोग्य केंद्रांना कोरोना केअर सेंटर आॅक्सीजनसह आत्तापासून स्थापन करण्याची गरज आहे. ही सूचना करतांनाच चंद्रपूर जिल्ह्याच्या धर्तीवर प्रत्येक ग्रामपंचायतीला लोकसंख्येच्या आधारे शाळेमध्ये विलगिकरण करण्याकरीता आर्थिक मदत देने जरुरी वाटते. हा प्रयोग चंद्रपूर मध्ये यशस्वी होत आहे. यवतमाळ जिल्ह्यात खनीज किंवा इतर निधीतून ग्रामपंचायत स्तरावर विलगिकरण व्यवस्था करण्यासाठी निधी उपलब्ध करावा अशी सूचना जिल्हाधिकाऱ्यांना अहीर यांनी केली.

ग्रामिण भागात लहानशा घरात एखादा संक्रमित असेल तर घरातील इतरांनाही लागन होत आहे. प्रत्येक ग्रामपंचायत क्षेत्रात एक विलगिकरण केंद्र अत्यावश्यक आहे. जनतेची मागणी आहे की, टेस्टींग नंतर ज्यांचा अॅंटीजेन टेस्ट पाॅझीटीव असेल अशांना संशयीत रूग्ण महणुन न ठेवता त्यांना कोरोना सेंटरवर त्वरीत पाठविने योग्य राहील यामुळे संक्रमण वाढणार नाही. सोबत लसिकरण वेगाने करणे गरजेचे आहे, जनतेची तशी मागणीही आहे इत्यादी विशयावर जिल्हाधिकारी यांचेसोबत चर्चा केली. यावेळी राजेंद्र डांगे, दिनकर पावडे, प्रविन प्रजापती, नितीन गिरी, अमोल ढोने व भाजप पदाधिकारी उपस्थित होते.