महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात पेट्रोल शंभरी पार, महागाईच्या भडका.

✒नीलम खरात, मुंबई प्रतिनिधी✒
मुंबई :- महाराष्ट्र राज्यात मोठ्या प्रमाणात कोरोना वायरसचा विस्फ़ोट सुरु असुन त्यामुळे शासनाने लॉकडाऊन आणि कडक संचारबंदी लावल्यामुळे अनेक गरीब लोक बेरोजगार झाले आहेत. त्या गरीब परीवाराना दोन वेळेच्या जेवनाचे हाल होत आहे. त्यातच गेल्या काही दिवसात देशात महागाईचा विस्फ़ोट होत असल्याचे दिसून येत आहे. गेल्या काही दिवसांपासून केंद्र शासन गरीब परीवाराचे रक्त पित असल्याचे महागाईच्या रुपात समोर येत आहे. इंधनाच्या किंमतीत सातत्याने रोज वाढ होत आहे. शासन गरीब परीवाराच्या टाळूवरच लोणी खाण्यात व्यस्त असल्याचे दिसून येत आहे.
आज पुन्हा एकदा तेल कंपनीने इंधन तेलाचे पेट्रोल – डिझेलच्या दरात वाढ केली आहे. आणि केंद्र सरकार आणि राज्य सरकार कुंभकर्णाची भुमीका घेऊन झोपी गेल्याचे दिसून येत असल्याचे मत अनेक परीवारानी व्यक्त केल आहे. महाराष्ट्रातील बहुतांश शहरात पेट्रोलने शंभरी गाठली आहे. तर डिझेलचा दरही 90 रुपये प्रतिलीटर इतका झाला आहे.
गरीब परीवार जगणार कसा ?
राज्यात लाॅकडाऊनमध्ये पुन्हा महागाईचा भडका उडाला आहे. आज मुंबईमध्ये पेट्रोलची किंमत रोज वाढत आहे. पण आता पुन्हा महामारीच्या काळात दरवाढ झाल्याने सर्वसामान्यांचे आर्थिक गणित बिघडण्याची शक्यता आहे. तसेच पेट्रोलच्या किंमती वाढल्याने भाजीपाल्यांच्या किंमतीही वाढण्याची शक्यता आहे.