सुरुंग ….

57

सुरुंग ….

सुरुंग ....

सुरुंग …. मराठी कविता

डोळ्यासमोर माझ्या
मीच चाललो आहे
धर्मवेड्या स्मशानात
मी मलाच जाळलो आहे

भोगल्या जीवन छटांना
कां गहिवरून आले
सांभाळल्या भावनांचे
डोईछत्र गाडलो आहे

इथे पेरणार होतो
सुरुंग समतेचा
द्विअर्थी माणसांच्या
गर्दीत नाडलो आहे

आता जेंव्हा स्मशाने
जळताना पाहतो तेव्हा
कसे आसवात त्यांच्या
स्वतःला वाढलो आहे

हे आयुष्य संध्याकाळी
येणार नाही पुन्हा
गेली निघून अवधी
ज्या साठी लढलो आहे….

पदमाकर अंबादे
पुलगांव