चरई आदिवासी वाडी येते भीत कोसळून ८ वर्षीय मुलगी ठार तर ३ जण जखमी

चरई आदिवासी वाडी येते भीत कोसळून ८ वर्षीय मुलगी ठार तर ३ जण जखमी

चरई आदिवासी वाडी येते भीत कोसळून ८ वर्षीय मुलगी ठार तर ३ जण जखमी

सचिन पवार माणगांव तालुका प्रतिनिधी ८०८००९२३०१

तला तालुक्यातील चरई आदिवासी वाडी येतील भीत कोसळून ८ वर्षीय मुलगी ठार तर ३ जण जखमी झाल्याची घटना समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की चरई आदिवासी वाडी येते राहत असलेल्या सुनीता अशोक मुकणे या आपल्या चार मुलासह घरी झोपल्या असता सकाळी ४.१५ च्या सुमारास मोठा आवाज झाला असता त्या जाग्या झाल्या असता घराच्या मागच्या बाजूची भीत कोसळून त्या खाली सुवर्णा मूकने, संतोष मुकने, तन्वी मुकणे आणि तुषार मुकणे हि आपली मुले ढीगाऱ्यायाखाली अडकल्याने त्याने पहिले. व तात्काळ त्यांनी मदतीसाठी आरडाऔरड केला. त्यांचा आवाज एकूण शेजारी राहत असलेल्या ग्रामस्थ धावून आले व त्याने ढिगारा बाजूला करून सर्व जखमीना बाहेर काढले.

यावेळी डॉक्टराना बोलवलं असता डॉक्टरांनी गंभीर जखमी झालेले सुवर्णा अशोक मुकणे वय वर्ष 8 ही मृत झाल्याचे घोशीत केले. तसेच इतर जखमी झालेले संतोष मुकणे, तन्वी मुकणे,तुशार मुकणे यांना माणगांव येशील उपजिल्हा रुग्णालय माणगांव येथे हलविण्याचे सांगितले जखमी झालेले याची परिस्थिती नाजूक असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी मुंबई येतील जे जे रुग्णालय येते पाठविण्यात आले आहे भित कोसळ्याची बातमी समजतात स्थानिक तला तालुक्यातील आपत्ती व्यवस्थापण प्रमुख श्री कनशेट्टी यांनी ताबडतोब आपले सहकार्य सह अपघात स्थळी भेट दिली व सर्व शासकीय यंत्रणा कामाला लावून अपघात ग्रस्त मुलांना स्व खर्चाने मुलांना दवाखान्यात नेण्याची व्यवस्था केली मुंबई येते रुग्णालय दाखल होताच तहसीलदार याने समाजसेवक कृष्णा महाडिक यांना संपर्क करून माहिती दिली असता महाडिक यांनी ताबडतोब डॉक्टराचे पथक बोलावून उपचार सुरु केले जखमी असल्या पैक्की एकाची तबेत नाजूक असली तरी उपचाराला तो चांगले प्रतिसाद देत असल्याचे डॉक्टरांणी सांगितलं आहे. प्रशकीय काम करत असताना तहसीलदार कनशेट्टी यांनी केलेल्या आर्थिक मदत प्रसंगवाधाने गरीब कुटूंबाला मदत या वरून माणुसकी अजून जिवंत आहे असे पाहायला मिळत आहे. त्याच्या या सामाजिक बाधिलकी जोपासून विविध स्तरातून कौतुक होत आहे.