मनोज संसारे यांना राज्यसभेची उमेदवारी देण्यात यावी – स्वाभिमानी युथ रिपब्लिकन पार्टीचे रायगड जिल्हा महेश साळुंखे
संतोष आमले
पनवेल तालुका प्रतिनिधी
9220403509
येत्या जून महिन्यामध्ये राज्यसभेच्या महाराष्ट्रातील सहा जागांसाठी निवडणूक होणार आहे. या निवडणूकीमध्ये उमेदवारी देताना कोणत्याही राजकीय पक्षाने आंबेडकरी चळवळींच्या नेत्यांचा विचार केलेला दिसत नाही. स्वाभिमानी युथ रिपब्लिकन पार्टीचे रायगड जिल्हा अध्यक्ष महेश साळुंखे यांनी मागणी केली आहे की स्वाभिमानी रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष मनोज संसारे यांना राज्यसभेची उमेदवारी देण्यात यावी.
मनोज संसारे हे गेली ३५ ते ४० वर्ष राजकीय व सामाजीक क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत. संपूर्ण महाराष्ट्रात त्यांचे कार्यकर्ते काम करीत आहे. या निवडणूकीमध्ये दलित समाजातील नेत्याला राज्यसभेची उमेदवारी देण्यात यावी – यापूर्वी आंबेडकरी चळवळींतील ४ नेत्यांनी खासदारकी उपभोगली आहे. आता तरुण नेतृत्व म्हणून राज्यसभेसाठी मनोज संसारे यांच्या नावाचा विचार करण्यात यावा अशी मागणी महेश साळुंखे यांनी सर्व पक्षीय नेत्यांकडे केली आहे.