प्रलंबित वनहक्क दावे तात्काळ मार्गी लावा-भाजपा तालुका एटापल्ली, तहसीलदारांना दिले निवेदन. मागणी पूर्ण न झाल्यास करण्यात येईल आमरण उपोषण, भाजपाचा इशारा

मारोती कांबळे

गडचिरोली जिल्हा ग्रामीण

मो.नं 9405720593

एटापल्ली तालुका हा अतिदुर्गम नक्षलग्रस्त भाग म्हणून ओळखल्या जातो,या तालुक्यात बहुतांश विकास झाला नाही,एटापल्ली तालुक्यातील प्रत्येक गाव विकास पासून कोसो दूर आहे.

तालुक्यात वनहक्क दावे प्रलंबीत असून तात्काळ मार्गी लावा व आमच्या आदिवासी व वनहक्क दावेदारांना समाधान करा तसेच नवीन वनहक्क पट्टे मंजूर करण्यात यावे.समूदायास कायदेशीर रित्या संरक्षणाचा कोणताच अधिकार नव्हता.३१ डिसेंबर २००७ पासून या कायद्याच्या कलम ५ अन्वये समूहांना हे हक्क प्राप्त झाले.ग्रामसभा सामूहिक वनसंसाधनाचे वन्यजीवन,वने व जैवविविधता वापरासाठी मुभा व रक्षण व वापरासंबंधीचे नियम करू शकते आणि या नियमांचे पालन होत नसल्यास,ग्रामसभेला योग्य ती पावले उचलण्याचे अधिकारही आहेत (कलम ५ (ड)).

म्हणूनच जर वन विभागालादेखील गुरुचरण जमीन किंवा सामूहिक जमिनीवर वृक्ष लागवड करायची असेल तर,या सामूहिक वनसंसाधनांवर असलेले अधिकार समूहाचे आहेत असे म्हणून ग्रामसभा हे काम थांबवू शकतात.जंगल जर खाण किंवा इतर कामांसाठी वापरले जात असेल तर हे जंगल सामुहिक वनसंसाधन आहे व त्याचे मूळ रहिवासाचे स्थान तसेच सांस्कृतिक आणि नैसर्गिक वारसाचा भाग असल्याने त्यावर त्याचा हक्क आहे व त्याचे रक्षण करण्याचा त्यांना अधिकार आहे असा दावा ग्रामसभा करू शकते.याचा अर्थ वनविभाग किंवा सरकार किंवा जंगल लुटारूंनी काहीही ठरवले तरी गाव समूह त्याला विरोध करून गाव समूहाचे निर्णय अंमलात आणू शकतात आणि त्याच्या जंगलाचे रक्षण करू शकतात करिता वन हक्क पट्टे आमच्या आदिवासी बांधवाना मिळावी.

तालुक्यातील प्रत्येक गावात शासनाचे प्रत्येक योजना प्रत्येक घरी पोचण्याची उपाययोजना करून शासनाचे यंत्रणा व शासकीय अधिकारी कर्मचारी यांना सज्ज करून घरोघरी योजनेचा लाभ मिळावा करीता प्रयत्न करावे.तालुक्यातील मजगी,शेत तळे,बोडी मंजूर करून या पासून मिळणारा लाभ करिता सर्व नागरिकांना संबंधित अधिकारी मार्फत मार्गदर्शन करण्याकरिता सज्ज करावे.

तालुक्यातील नागरिकांनाचा आरोग्य धोक्यात असून तालुक्यात अनेक ठिकाणी आरोग्य सेवा नसल्याने ग्रामीण भागातिला लोकांना ६०-७० किमी चा प्रवास करीत ग्रामीण रुग्णालयात यावे लागते रस्ते व्यवस्थित नसल्याने व वाहतूक सेवा सुरळीत नसल्याने अनेक नागरीकांची जिवीत हानी होत आहे.तालुक्याचा ठिकाणी सुसज्जन कर्मचारी वर्ग द्यावा,प्राथमिक आरोग्य उपकेंद्र कोटमी येथील कर्मचाऱ्यांची रिक्त पदे तात्काळ भरून उपकेंद्र सुरू करण्यात यावे.

एटापल्ली ते कसनसुर मार्ग अर्धवट झाले असून या अर्धवट कामा मुळे नागरिकांना ये-जा करण्यासाठी खूप त्रास सहन करावा लागत आहे व अर्धवट रस्त्यामुळे अपघात वाढत चालले आहे तरी एटापल्ली ते कसनसुर रास्ता तात्काळ पूर्ण करण्याचा आदेश देण्यात यावे.

या सर्व प्रलंबित समस्या तात्काळ मार्गी लावण्याकरीत भाजपा एटापल्ली तर्फे अनेकदा निवेदन सादर करण्यात आले होते परंतु शासन व प्रशासनांस अनेकदा साखळी घालून सुद्धा कारवाही न झाल्याने भाजपा एटापल्ली तर्फे आमरण उपोषणाचा इशारा देत उपोषणाला मंजुरी देण्यासाठी निवेदन देण्यात आले.

यावेळी मोहन नामेवार भाजपा एटापल्ली,बाबुराव गंपावार माजी जिल्हा उपाध्यक्ष गडचिरोली,अशोक पुल्लूरवार माजी तालुका अध्यक्ष एटापल्ली,शंकरजी पुल्लूरवार, निखिल गादेवार, सम्मा जेट्टी, बाबला मुजुमदार, विजय गजाडीवार, एस.आर.गुंडावार व भाजपाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here