नसरापूर ग्रामपंचायत हद्दीतील वीज पूर्ववत

नसरापूर ग्रामपंचायत हद्दीतील वीज पूर्ववत

नसरापूर ग्रामपंचायत हद्दीतील वीज पूर्ववत

नसरापूर ग्रामपंचायत हद्दीतील वीज पूर्ववत

✒️रुपेश महागावकर
खालापूर प्रतिनिधी
📞93731 57184

नासरापुर;-ग्रामपंचायत नसरापूर हद्दीतील मौजे कळंबोली वाडी येथे असलेला सब स्टेशन वरून जाणारी एस टी लाईन दिनांक १३ मे रोजी अवकाळी पडलेल्या पावसामुळे खंडित झाली ग्रामपंचायत नसरापूर हद्दीतील चिंचवली, गणेगाव, सालवड, चांधई, कळंबोली गावातील त्याच बरोबर नेरळ, कशेले, कडाव, विभागाला पोहचवली जाणारी ५ एस टी विजखांब व ९/१० झाडे पडल्याने खंडित झाली होती नेरळ, कशेले विभागात विविध मार्गाने अडचणी सोडवून वीज पूर्ववत करण्यात आली. परंतु काही भागात फार मोठ्याप्रमाणात अडचणी उदभवल्या इतक्या मोठ्या प्रमाणात वीज खांब बसविणे सहज शक्य नसल्याने तेथील वीज पुरवठा १५ मे रोजी रात्री ११ पर्यंत सुरळीत सुरू झाला परंतु १६ मे रोजी झालेल्या मुसळधार पावसाने आणि वादळ वाऱ्यामुळे त्यात आणखी अडथळा निर्माण झाला १८ एस टी विजखांब तर २ रोहित्र पडल्याने अत्यंत अवघड परिस्थिती निर्माण झाली होती त्यामुळे खंडित झालेला वीजपुरवठा पूर्ववत करता येत नव्हता आज मात्र सर्व प्रकारच्या अडचणी सोडवून सर्व विभागातील वीज पुरवठा रात्री १० वाजून ३५ मिनिटाने पूर्ववत करण्यात यश आले असून यासाठी पनवेल कार्यकारी अभियंता गणेश लटपटे, कर्जत चे उप कार्यकारी अभियंता प्रकाश देवके, सहाय्यक अभियंता वैभव सिंग साहेब यांनी विविध कौशल्य वापरून वीज प्रत्येक विभागाला पोहचविण्यासाठी प्रयत्न केले यावेळी अ‍ॅड.संपत पांडुरंग हडप, ज्ञानेश्वर सावंत, जनार्दन कोळंबे, सचिन हडप, राजेश मोहिते, अतुल हडप, शुभम राऊत, सुरज हडप त्याच बरोबर आजूबाजूच्या गावातील अनेक ग्रामस्थ देखील उपस्थित होते