गोरेगांव पश्चिम मधे नालेसफाईच्या कामाना वेग.

गोरेगांव पश्चिम मधे नालेसफाईच्या कामाना वेग.

✍️ पप्पू वि. नायर ✍️
मुंबई शहर प्रतिनिधी
मो :- 7304654862

मुंबई :- गोरेगांव पश्चिम प्रेम नगर मधे पावसाळ्यात होणाऱ्या नागरिकांच्या समस्याचे निवारनार्थी, व आर्थिक नुकसानीच्या अनुषंगाने ठिक – ठिकाणी गटारे – नाले साफसफाईच्या कामाना वेग आल्याचे दिसून येत आहे. प्रेम नगर मधील अर्धा भाग एस आर ए मधे गेला असून बाकी चा भाग लोक वास्त्यांनी भरलेला आहे, त्यात तेथील अर्धे गटारे – नाले भुईसपाट झालेले आहे व काही गटारे – नाले कार्यरीत असून पावसाळ्यात पाणी तुंबून तेथील नागरिकांचे आर्थिक नुकसान होऊ नये या अनुषंगाने मुंबई पालिकेने महत्वाचा निर्णय घेऊन नाले सफाई अभियान सध्या प्रेम नगर मधे चालू केलेलं आहे.

तरी प्रेम नगरच्या नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण सध्या पहावयास मिळाले. कारण मुंबई पालिका सहसा या भागात जास्त लक्ष देत नाही, त्यामुळं तेथील नागरिकांना पावसाळ्याच्या होणाऱ्या समस्यांना प्रत्येक वर्षी तोंड द्यावं लागतं व आर्थिक नुकसान सोसावं लागतं. पण या वेळी मुंबई पालिकेने महत्वाची भूमिका घेऊन गटारे -नाले साफसफाईचा जो निर्णय घेऊन तेथील नागरिकांना काहीसा दिलासा दिला आहे. व नागरिकांनी सुद्धा पालिकेचे कौतुक केले आहे. व सफाईच्या कामाना तेथील नागरिक ही उत्तम प्रतिसाद देत आहेत.