*नागपुरात शिवभोजन केंद्र वाटपात घोळ झाल्याची बातमी दिशाभूल करणारी*
*आरोप करण्यात आलेल्या शिवभोजन केंद्रांना अद्याप परवानगी नाही*

*आरोप करण्यात आलेल्या शिवभोजन केंद्रांना अद्याप परवानगी नाही*
✍मनोज खोब्रागडे✍
विदर्भ ब्युरो चीफ प्रतिनिधी
मिडीया वार्ता न्यूज
8208166961
नागपूर:-राज्यात कोणीही उपाशी राहू नये या उद्देशाने राज्यात सूरू करण्यात आलेल्या “शिवभोजन थाळी” योजनेत घोळ झाल्याच्या बातम्या काही प्रसार माध्यमांमध्ये प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या मात्र ह्या बातम्या दिशाभूल करणाऱ्या असल्याची माहिती नागपूर अन्नधान्य वितरण अधिकाऱ्यांनी दिली आहे…
अन्नधान्य वितरण अधिकारी यांनी दिलेल्या माहितीनुसार नागपूर शहरात ३१ मे २०२१ पर्यंत राज्य शासनाकडून एकूण ४० केंद्रांना मंजुरी दिली असली तरी आत्तापर्यंत फक्त १५ शिवभोजन केंद्रे सूरू करण्यासाठी परवानगी देण्यात आलेली आहे. मंजुरी देताना ही शिवभोजन केंद्र राज्य शासनाने आखून दिलेल्या निकषाची पूर्तता करतात का याची पडताळणी करूनच परवानगी देण्यात आलेली आहे.
शिवभोजन केंद्रांची नावांची यादी शासनाकडून मंजूर होऊन आल्यानंतर अन्नधान्य वितरण अधिकाऱ्यांकडून या ठिकाणी जाऊन पाहणी (स्थळ निरीक्षण) करण्यात येते त्यानंतर कागदपत्रांची पडताळणी केली जाते आणि त्यानंतरच शिवभोजन केंद्रांना परवानगी दिली जाते. राज्य शासनाने आखून दिलेल्या अटी आणि शर्तींची पुर्तता शिवभोजन केंद्र जर करत नसतील तर त्यांना परवानगी देण्यात येत नाही.
प्रसारमाध्यमांवर प्रसारीत झालेल्या बातम्यांमध्ये काही शिवभोजन केंद्रांचा उल्लेख करण्यात आलेला आहे. या सर्व शिवभोजन केंद्रांनी राज्य सरकारच्या अटी व शर्तींची पुर्तता केलेली आहे. सदरच्या वृत्तामध्ये ४६ केंद्रांना मान्यता दिल्याचा उल्लेख करण्यात आलेला आहे मात्र नियमानुसार पाहणी (स्थळ निरीनिरीक्षण) केल्यानंतर आणि कागदपत्रांची पडताळणी केल्यानंतर मंजुर झालेल्या केंद्रांना परवानगी देण्यात येते. त्यामुळे सद्यस्थिती मध्ये फक्त १५ केंद्रांनाच परवानगी देण्यात आलेली असल्याची माहीती देखील अधिकारीऱ्यांनी दिली आहे. त्यामुळे आरोप करण्यात आलेल्या केंद्रांना मंजुरी मिळाली असली तरी शिवभोजन केंद्रे सूरू करण्यासाठी परवानगी दिली नाही….