उर्जानगरातील आयुषनगर येथे उद्यान बांधकामासाठी ३० लक्ष रु. निधी मंजुर* *आ. सुधीर मुनगंटीवार यांच्‍या प्रयत्‍नांचे फलित*

51

*उर्जानगरातील आयुषनगर येथे उद्यान बांधकामासाठी ३० लक्ष रु. निधी मंजुर*

*आ. सुधीर मुनगंटीवार यांच्‍या प्रयत्‍नांचे फलित*

उर्जानगरातील आयुषनगर येथे उद्यान बांधकामासाठी ३० लक्ष रु. निधी मंजुर* *आ. सुधीर मुनगंटीवार यांच्‍या प्रयत्‍नांचे फलित*
उर्जानगरातील आयुषनगर येथे उद्यान बांधकामासाठी ३० लक्ष रु. निधी मंजुर*
*आ. सुधीर मुनगंटीवार यांच्‍या प्रयत्‍नांचे फलित*

त्रिशा राऊत
चिमूर तालुका प्रतिनिधी
मिडीया वार्ता न्यूज चंद्रपूर
Mo 9096817953

चिमूर (चंद्रपूर):-विधीमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुखा तथा माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांच्‍या पुढाकाराने चंद्रपूर तालुक्‍यातील उर्जानगर परिसरातील आयुषनगर येथील मोकळया जागेत उद्यानाचे बांधकाम करण्‍यासाठी ३० लक्ष रु. निधी मंजुर करण्‍यात आला आहे.
ग्रामविकास विभागाच्‍या ३१ मार्च २०२१ रोजीच्‍या शासन निर्णयान्‍वये २५१५ या लेखाशिर्षा अंतर्गत सदर उद्यानाच्‍या बांधकामासाठी ३० लक्ष रु. निधी मंजुर करण्‍यात आला आहे. आयुषनगर परिसरातील नागरिकांना आ. सुधीर मुनगंटीवार यांनी दिलेला शब्‍द पुर्ण केला आहे.

या आधीही आ. सुधीर मुनगंटीवार यांनी उर्जानगर येथे ८ कोटी ७८ लक्ष रु. किंमतीची पाणी पुरवठा योजना, महानिर्मिती कंपनीच्‍या सी.एस.आर. निधीच्‍या माध्‍यमातुन विविध विकासकामे, जलशुध्‍दीकरण संयंत्र, एलईडी पथदिवे अशी विविध विकासकामे पुर्णत्‍वास आणली आहे.
आयुषनगर येथे ३० लक्ष रु. निधी खर्चुन उद्यान बांधकाम करण्‍याची मागणी पुर्णत्‍वास येत असल्‍यामुळे परिसरातील नागरिकांमध्‍ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.