बिरवाडी येथील महावितरणच्या गलथान कारभारामुळे - नागरिकांचा जीव धोक्यात

बिरवाडी येथील महावितरणच्या गलथान कारभारामुळे – नागरिकांचा जीव धोक्यात

बिरवाडी येथील महावितरणच्या गलथान कारभारामुळे - नागरिकांचा जीव धोक्यात

✍ किशोर किर्वे ✍
महाड तालुका प्रतिनिधी
मो.९५०३०००९५९

महाड(रायगड):- महाड तालुक्यातील मौजे बिरवाडी शहरातील(कराड आळी) येथुन नागरी वस्तीतून महावितरणची विज पुरवठा करणारी लाईन गेलेली असून विज लाईन वर गेली अनेक वर्षांपासून मोठ-मोठी झाडे पडण्याच्या स्थितीत आहेत व लाईटचे खांब सुद्धा जीर्ण झालेले असून त्यासंदर्भात नागरिकांकडून वेळोवेळी महावितरण अधिकारी व कर्मचारी यांना सूचना दिलेल्या असताना सुद्धा अद्याप कोणतीही दखल घेतली गेली नसून नागरिकांना उडवाउडवीची उत्तरे देण्यात येत आहेत सदरील विज लाईन अनेक घरांलगत असल्याने नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झालेला आहे यापूर्वीही बिरवाडी शहरात अशा प्रकारच्या अनेक घटना घडल्या असून काही नागरिकांची जीवित हानी झालेली आहे परंतु कोणतीही जिवितहानी होऊ नये यासाठी पावसाळ्यापूर्वी उपाययोजना करणे गरजेचे असताना देखील महावितरणचे अधिकारी व कर्मचारी याकडे दुर्लक्ष करीत असून गांभीर्याने घेताना दिसत नाहीत भविष्यात होणाऱ्या अपघाताची अधिकारी व कर्मचारी वाट बघत असल्याची खंत येथील नागरिकांनी व्यक्त केली आहे थकित वीज बिले वसुलीसाठी अधिकारी व कर्मचारी नागरिकांना वेठीस धरतात बिन न भरल्यास वीज पुरवठा खंडित करतात मग नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झालेला असताना सुद्धा सुस्त कशे बसतात यांना वरिष्ठांचा धाक राहिलेला नाही की वरिष्ठांकडून वरदहस्त मिळत आहे अशा प्रकारचा प्रश्न जनतेमध्ये निर्माण झालेला असून कराड आळी येथील धोकादायक असलेली झाडे व खांब येणाऱ्या दहा दिवसांत हटवले नाहीत तर नागरिकांच्या जिवितास धोका बघता महावितरण विरोधात तक्रार व आंदोलन करण्याचा इशारा येथील नागरिकांनी दिला आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here