गजानन पाथोडे यांना हायकोर्टाचा दिलासा:एफ.आय.आर.केला रद्द.
अरुण रामुजी भोले
नागभिड तालुका प्रतिनिधी
9403321731
नागभिड—चंद्रपूर जिल्हा मध्यवती बँकेचे संचालक गजानन पाथोडे हे सहकार क्षेत्रातील युवा नेते म्हणून चंद्रपूर जिल्हयात प्रख्यात आहेत. तसेच ओबीसी नेतृत्व म्हणून त्यांची ओळख नागभीड तालुक्याच्या राजकारणात आहे. तसेच चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेत संचालक म्हणून ते निवडून आले आहेत. चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँक ही शेतकऱ्यांची बँक म्हणून ओळखली जाते या माध्यमातून त्यांनी अनेक योजना या शेतकऱ्यांपर्यंत पोहचवल्या आहेत. त्यांचे वाढते वजन पाहता त्यांना अडचणीत आणण्याचा विरोधकांकडून वारंवार प्रयत्न करण्यात येत आहे. मागील वर्षी चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या लेखापाल यांनी सोने गहाण प्रकरणात बँकेचे संचालक गजानन पाथोडे व त्यांचे नातेवाईक यांनी बँकेची आर्थिक फसवणूक केल्याचा अहवाल बँकेच्या अध्यक्षाकडे सोपविला होता. महाराष्ट्र राज्य को- ऑपरेटिव्ह अँक्ट चा भंग करीत बँकेचे लेखापाल यांनी अधिकार नसताना सोने तपासणी केली. शेवटी बँकेचे अध्यक्ष यांनी मुख्याधिकारी यांना अहवाल सादर केला व मुख्याधिकारी यांनाही बँकेच्या एका अधिकाऱ्यांची नेमणूक करून नागभीड येथील पोलीस स्टेशन मध्ये गजानन पाथोडे व कुटुंबीय यांच्या विरोधात एफ.आय.आर.दाखल केला. पाथोडे यांनी चंद्रपूर येथील जिल्हा व सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला व तिथे पाथोडे यांच्यावर गुन्हा दाखल करताना कायद्याचा दुरुपयोग करत तसेच महाराष्ट्र राज्य को- ऑपरेटिव्ह अँक्ट चा भंग केल्याचे कोर्टाला लक्षात आणून दिले. त्यानंतर कोर्टाने तात्काळ पाथोडे व नातेवाईक यांना अंतरिम जामीन मंजूर केला. सोने तारण कर्ज उचलताना पाथोडे यांनी बँकेच्या नियमांचे तंतोतंत पालन करून कर्ज उचल करणे हा गुन्हा होत नाही. यानंतर पाथोडे यांनी त्यांच्या दाखल करण्यात आलेला गुन्हा हा राजकीय हेतुपोटी तसेच कायद्याच्या दुरुपयोग करून करण्यात आलेला असल्याने हा दाखल एफ.आय.आर.रद्द करण्यात यावा यासाठी हायकोर्टात याचिका दाखल केली. हायकोर्टाने पाथोडे यांच्यावर गुन्हा दाखल करताना महाराष्ट्र राज्य को- ऑपरेटिव्ह अँक्ट चा भंग केल्याचे निदर्शनास आल्याने हा एफ.आय.आर.रद्द करण्याचा आदेश काढला.. त्यामुळे पाथोडे यांना दिलासा मिळाला… पाथोडे यांच्या वतीने अँड.अमित बंड यांनी बाजू मांडली.
प्रतिक्रिया.
-राजकीय हेतुपोटी आपल्याला खोट्या प्रकरणात अडकवण्याचा विरोधकांचा डाव होता.यामुळे माझी व माझ्या कुटुंबाची नाहक बदनामी व मानसिक त्रास सहन करावा लागला परंतु माझा न्यायव्यवस्थेवर विश्वास होता व शेवटी सत्याचा विजय झाला.
-॥ गजानन पाथोडे.॥
संचालक- चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँक,चंद्रपूर.