जनता कन्या विद्यालय नागभिड येथे कौशल्य व व्यक्तिमत्त्व विकास कार्यशाळेचे यशस्वी आयोजन
अरुण रामुजी भोले
नागभिड तालुका प्रतिनिधी
9403321731
नागभिड— येथील स्वप्नपूर्ती बहूउद्देशीय संस्था व जनता कन्या विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय नागभिड यांचे सयुक्त विद्यमाने सहाय्यक शिक्षक श्री सतिश मेश्राम सर यांच्या संकल्पनेतून व जनता शिक्षण संस्था नागभिड चे सचिव प्राचार्य डाॕ अमीर धमाणी यांच्या मार्गदर्शनाने जनता कन्या विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय नागभिड येथे कौशल्य व व्यक्तिमत्त्व विकास या नऊ दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यशाळेचे उद्घाटन दि.७ जून ला प्राचार्य डाॕ अमीर धमाणी यांचे अध्यक्षतेखाली व प्राचार्या सौ.तरारे मॕडम व श्री चुटे सर यांचे उपस्थितीत पार पडले. या कार्यशाळेतील सर्व घटकांची संकल्पना ही आयोजक सतिश मेश्राम यांची होती त्यात बी स्मार्ट, स्वतःला ओळखा,जिवनाचे सुत्र,आत्मविश्वास वाढविणे,तणाव व्यवस्थापन, धेय्य निश्चिती ,स्टेज मॕनेजमेंट,गट चर्चा व सादरीकरण असे अनेक घटक होते.या विविध घटकांवरती विद्यार्थिनींना मार्गदर्शन प्राचार्य डाॕ.अमीर धमाणी सर,पी.डी.काटकर सर,अनिल पेटकर सर,श्रीकांत डोंगरे सर ,अशोक कष्टी सर व सतिश मेश्राम सर यांनी केले.
सदर कार्यशाळेकरीता १५ वर्षावरील विद्यार्थिनींना संधी देण्यात आली होती,व त्यात एकूण २७ विद्यार्थिनी सहभागी झाल्या. यात विवीध उपक्रम ,खेळ ,मनोगत अश्या विविध शैलींचा उपयोग करुन अगदी खेळीमेळीच्या वातावरणात विद्यार्थिनींच्या व्यक्तिमत्त्व विकासाला योग्य मार्गदर्शन करण्यात आले.
या कार्यशाळेचा समारोप दि.१५ जून २०२२ ला जनता शिक्षण संस्थेचे सहसचिव मा.डाॕ.रविद्र कावळे यांचे अध्यक्षतेखाली व सौ.तरारे मॕडम व सौ.रुपाली पाथोडे मॕडम यांचे उपस्थितीत पार पडला
याप्रसंगी सर्व मान्यवरांनी या उपक्रमाचे स्वागत केले,तसेच अनेक विद्यार्थिनिंनी आपले मनोगत व्यक्त केले व या कार्शाळेचा कसा फायदा झाला व होईल हे विषद केले. या प्रसंगी विद्यार्थिनींना प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन विद्यार्थिनी सोनू कडू व आभार तनूश्री मेश्राम हीने मानले.
या कार्यशाळेच्या यशस्वितेकरीता जनता शिक्षण संस्था नागभिड चे सर्व पदाधिकारी,विद्यालयाचे सर्व कर्मचारी,स्वप्नपूर्ती संस्थेचे पदिधीकारी,तसेच पाथोडे मॕडम,आशिष राहूड सर,ओमप्रकाश मेश्राम,श्रीकृष्ण देव्हारी सर,डॕनीयल देशमूख सर ,सर्व विद्यार्थिनी व पालक यांनी सहकार्य केले.