चंद्रपूर : ‘लॉयड मेटल्स’ कारखान्याला भीषण आग; लाखोंचे नुकसान

चंद्रपूर : ‘लॉयड मेटल्स’ कारखान्याला भीषण आग; लाखोंचे नुकसान

चंद्रपूर : ‘लॉयड मेटल्स’ कारखान्याला भीषण आग; लाखोंचे नुकसान

🖋 अश्विन गोडबोले
📞 8830857351

चंद्रपूर मधील घुग्घुस येथील ‘लॉयड मेटल्स’ कारखान्यातील ट्रान्सफार्मरला सायंकाळी सात वाजताच्या सुमारास भीषण आग लागली. आगीने रौद्ररूप धारण करीत संपूर्ण कारखानाच कवेत घेतला. या आगीत लाखोंचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.चंद्रपूर शहरापासून २५ किलोमीटर अंतरावर घुग्घुस हे औद्योगिक शहर आहे. येथे लॉयड मेटल्स हा पोलाद कारखाना आहे. सायंकाळी सात वाजताच्या सुमारास वादळी वारा सुरू असतानाच कारखान्यातील ट्रान्सफार्मरला आग लागली. आगीने क्षणार्धात रौद्ररूप धारण केले. अग्निशमन पथक आणि पोलीस घटनास्थळी तैनात असून आगीवर नियंत्रण मिळविण्याचे प्रयत्न सुरू आहेत.