राष्ट्रीय आदिवासी एकता परीषद यांच्या सहकार्याने मोंढाळे येथील आदिवासी कुटुंबाना रेशन कार्ड चे वाटप
ईसा तडवी
मिडिया वार्ता न्युज
पाचोरा तालुका प्रतिनिधी
मो. 9860884602
पाचोरा :- आज दिनांक 18/06/2022 रोजी मौजे मोढांळे येथील आदिवासी कुटुंबे यांना रेशन कार्ड चे वाटप करण्यात आले, शासकीय योजना जसे वैद्यकीय, घरकुल असेल तसेच विविध शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी रेशन कार्ड हे अत्यंत महत्त्वाचा दस्तऐवज म्हणजे रेशन कार्ड यासाठी सरकारी कार्यालयाचे वुंबरटे झिझवावे लागतात. याची जाणीव संघटनेने घेत वेळोवेळी पाठपुरावा करत वंचीत तथा गरजु गरीब आदिवासी कुटुंबाना राष्ट्रीय आदिवासी एकता परीषद चे पद अधीकारी यांच्या हस्ते वाटप करुन तसेच पाचोरा तहसीलदार मा चावडे साहेब व पुरवठा विभाग यांचे देखील आभार मानले गेले.यावेळी सामाजिक कार्यकर्ते.मा. रणजीत तडवी, राष्ट्रीय आदिवासी एकता परीषद चे जिल्हा अध्यक्ष मा. गफुर तडवी, तालुका मा. जलाल तडवी, सचीव मा. जाकीर तडवी,उपअध्यक्ष मा, मुस्तफा तडवी कार्यकारी सदस्य मा. आलेरखा तडवी,कार्याध्यक्ष मा. अबजल तडवी,शाखा अध्यक्ष कदीर तडवी कलीम तडवी, शरीफ तडवी आदी कार्यकर्ते उपस्थित होते.