सावली येथे नवनिर्मित बसस्थानकाचे लोकार्पण

सावली येथे नवनिर्मित बसस्थानकाचे लोकार्पण

सावली येथे नवनिर्मित बसस्थानकाचे लोकार्पण

बाबा मेश्राम✍
सावली तालुका प्रतिनिधी
7263907273

*सावली*: – सावली मुख्यालयात.लोकार्पणाच्या प्रतिक्षेत असलेल्या नवीन बसस्थानकाचे नुकतेच राज्याचे मदत.व पुर्नवसन.,बहुजन.कल्याण ,मंत्री तथा जिल्हयाचे पालकमंत्री ना विजय.वड्डेटिवार यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले.,यावेळी मंचावर.उपप्रादेशिक परीवहन.महामंडळाचे उपमहाव्यवस्थापक शिवाजी जगताप,गडचिरोलीचे विभाग निमंत्रक अशोक वाडीभस्मे.जिल्हा मध्यवर्ती. सहकारी bank संचालक संदीप गड्डमवार , अधिवक्ता राम मेश्राम चंद्रपुर विभाग नियंत्रक स्मिता सुतवणे ,सावली नगराध्यक्ष लता लाकडे, उपाध्यक्ष संदीप पुण्यपवार ,विजय अभियंता नरेंद्र खांडेकर विजय मृत्यालवार,विजय कोरेवार आदी उपस्थित होते.
….लोकर्पण सोहळ्या प्रसंगी पालकमंत्री म्हणाले की हि जागा पुर्वी जलसंपदा विभागाची होती ,ती हस्तांतरित करण्यात आली ,तिनदा बस स्थानकाचे डिझाईन बदलविण्यात आले ,आणि सुविधा युक्त असे बसस्थानकाची वास्तु उभी झाली, बसस्थानक छोटे असले तरी सर्व सुविधा असणें आवश्यक आहे , यासाठिकाणी 2 कोटी 64 लाख रु खर्च करण्यात आले ,तसेच संरक्षक भिंत,कांक्रीटचे रस्ते यासाठी दिड कोटीचा अतिरिक्त निधी देण्यात येईल,
…. कोरोनाच्या काळात एसटीचा प्रवास खडतर झाला,एस टी धावत कि नाही वाटल पण राज्य शासनाने.दिड हजार कोटीची अतिरिक्त मदत करुन एस टी पुन्हा रस्त्यावर धावू लागली..ग्रामीण व सर्व सामान्य लोकासाठी एस टी ही जीवनवाहीनी आहे.
…. सावली येथील नवीन बसस्थानक हे.शहर.व तालुक्याच्या.दृष्टिने विकासाच्या बाबतीत एक मानाचा तुरा आहे…