विदर्भातून हजारो ओबीसी बांधव जाणार महाअधिवेशनाला : विदर्भवादी ओबीसी नेते डॉ. अशोक जीवतोडे
🖋 अश्विन गोडबोले
📞 8830857351
चंद्रपूर महानगर प्रतिनिधी
राष्ट्रीय ओबीसी महासंघाची नियोजन बैठक संपन्न
चंद्रपूर : – विदर्भाच्या विविध जिल्ह्यांतून हजारो ओबीसीबांधव दिल्ली येथील ओबीसी महाअधिवेशनाला जाणार असल्याचे नियोजन बैठकीच्या माध्यमातून विदर्भवादी ओबीसी नेते डॉ. अशोक जीवतोडे यांनी सांगितले. राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे सातवे महाअधिवेशन 7 ऑगस्टला न्यू दिल्ली येथील तालकटोरा इंडोअर स्टेडियम येथे आयोजित केले आहे.
या महाअधिवेशनाच्या नियोजनाच्या अनुषंगाने राष्ट्रीय ओबीसीं महासंघाच्यावतीने सर्व विंगच्या
पदाधिकाऱ्यांची सहविचार सभा घेण्यात आली.
या अधिवेशनाचे नियोजन करण्याच्या उद्देशाने राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे यांचे अध्यक्षतेखाली व समन्वयक डॉ. अशोक जीवतोडे यांच्या उपस्थितीमध्ये बैठकीचे आयोजन 19 जूनला दुपारी १ वाजता श्री. लीला सभागृह, जनता शिक्षण महाविद्यालयात येथे करण्यात आले होते. यावेळी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. महासचिव सचिन राजूरकर, उपाध्यक्ष प्रा. शेषराव येलेकर, उपाध्यक्ष डॉ. सुधाकर जाधव, विदर्भ प्रांत अध्यक्ष प्रदीप वादाफळे युवा अध्यक्ष सुभाष घाटे, सहसचिव शरद वानखेडे, कर्मचारी संघटनेचे शाम लेडे, गुणेश्वर आरिकर, प्रदेशाध्यक्ष प्रकाश भागरथ, युवा अध्यक्ष चेतन शिंदे, मनोज चव्हाण, महिला महासंघाचे सुषमा भड, रेखा बाराहाते, कल्पना मानकर, कर्मचारी महिला महासंघाच्या रजनी मोरे, विध्यार्थी संघटनेचे रोशन कुंभलकर आदी उपस्थित होते. डॉ. बबन तायवाडे यांनी ओबीसी समाजाची दशा व दिशा यावर यथोचित मार्गदर्शन केले. प्रास्ताविक सचिन राजूरकर यांनी केले. संचालन प्रा. रविकांत वरारकर तर आभार रजनी मोरे यांनी मानले. यावेळी विदर्भातून मोठ्या संख्येत ओबीसीबांधव बैठकीला उपस्थित झाले.