सुप्रीम कोर्टानं अनिल देशमुख व नबाब मलिक यांची मतदान करू देण्यासाठी ची याचिका फेटाळली
✍अजित दुराफे ✍
मुंबई महानगर प्रतिनिधी
77180 95197
मुंबई : – सविस्तर वृत्त याप्रमाणे आहे की ,
11 जूनच्या राज्यसभा निवडणुकीत दोन्ही नेत्यांना जामीन न मिळाल्याने मतदान करता आले नाही. आता अनिल देशमुख आणि नवाब मलिक महाराष्ट्र विधानपरिषद निवडणुकीत मतदान करण्याची परवानगी मागत आहेत. याआधी या दोन्ही नेत्यांनी मुंबई न्यायालयात याचिकाही दाखल केली होती, ज्यामध्ये त्यांना एमएलसी निवडणुकीत मतदान करण्याची मागणी करण्यात आली होती. परंतु, ही याचिका उच्च न्यायालयाने फेटाळून लावली. या दोघांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती परंतु त्या दोघांचीही याचिका सुप्रीम कोर्टान फेटाळून लावली आहे.