महिला संस्कार कलशचा आगळा ऊपक्रम

महिला संस्कार कलशचा आगळा ऊपक्रम

महिला संस्कार कलशचा आगळा ऊपक्रम
🖋 अश्विन गोडबोले
चंद्रपूर महानगर प्रतिनिधी
📞 8830857351

चंद्रपूर : – ज्येष्ठ पौर्णिमा,अर्थात वटपोर्णीमा!सत्यवानाचे प्राण वाचवण्यासाठी सावित्रीने यमलोक गाठलं.तेव्हापासून ह्या व्रताला सुरुवात झाली .पतीचे आरोग्य चांगले राहावे व सातजन्म हाच पती मिळावा हा यामागचा हेतू!पण काळ बदलला आणि बदलत्या काळानुसार परंपरेने चालत आलेल्या रूढी आणि परंपरा यावर विचारमंथन होऊ लागलं.प्रत्येक परंपरेला काय शास्त्रीय आधार आहे ,ह्यावर विचारमंथन होऊ लागलं.हाच धागा पकडून जुन्या परंपरेला छेद न देता, जून्या विचारांची कास धरत ,नव्या विचारांची सांगड घालत ,जुनी वटसावित्री ते आधुनिक वटसावित्री यांचा मेळ घालत एक नवीन संकल्पना *महिला संस्कार* *कलश* योजनेच्या अध्यक्षा उषा बुक्कावार यांनी आणली. सर्व संस्कार कलश च्या महिलांनी त्यांना यात साथ दिली. आज पंचमुखी हनुमान मंदिर देवस्थान,पांढरकवडा येथील जागृत हनुमान मंदीरात तब्बल पंधरा झाडांचे रोपण करण्यात आले . वडाच्या झाडाचे महत्व लक्षात घेता एकूण दहा वडाची झाडे आणि पाच चाफ्याची झाडे , त्याच्या संगोपनाची जबाबदारी घेऊन लावण्यात आली.याप्रसंगी पंचमुखी हनुमान मंदिर देवस्थान,पांढरकवडा चे सचिव लक्ष्मण सादलावार, उपाध्यक्ष के. बी. गौरकार,कोषाध्यक्ष बापुराव कुकुर्डे, सरपंच पांढरकवडा सुरेश तोतडे प्रामुख्याने उपस्थित होते .संस्कार कलश योजनेच्या अध्यक्ष उषा बुक्कावार, उपाध्यक्षा कल्पना पलिकुंडवार, सचिव रचीता रेगुंडवार तसेच महिला संस्कार कलश योजनेच्या ५० महिला सदस्य उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे यशस्वीरीत्या संचालन व आभारप्रदर्शन रोहिणी नि.नीले यांनी केले.वृक्षारोपणाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.