शंकरराव गोपाळराव महाडिक शाळेची दहावीच्या परीक्षेत १००% निकालाची घोडदौड सलग सातव्या वर्षी कायम

शंकरराव गोपाळराव महाडिक शाळेची दहावीच्या परीक्षेत १००% निकालाची घोडदौड सलग सातव्या वर्षी कायम

शंकरराव गोपाळराव महाडिक शाळेची दहावीच्या परीक्षेत १००% निकालाची घोडदौड सलग सातव्या वर्षी कायम

🗞मीडिया वार्ता न्यूज📰
पोलादपूर तालुका प्रतिनिधी – संदिप जाबडे
संपर्क – 8149042267

पोलादपूर(रायगड) – तालुक्यातील श्री शिवकृष्णा चॅरिटेबल ट्रस्ट संचलित श्री शंकरराव गोपाळराव महाडिक इंग्लिश मीडियम स्कूलचा निकाल सलग सातव्या वर्षी सुद्धा १००% टक्के निकालाची परंपरा कायम ठेवली आहे. यंदाही सात विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली होती. हे सर्वच विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून ग्रीष्मा अमोल भुवड ह्या विद्यार्थिनीने ८६% टक्के गुण मिळवित शाळेत प्रथम येण्याचा बहुमान पटकावला. साहिल संजय धुमाळ विद्यार्थ्याने ६९.४०% गुण संपादित करीत द्वितीय तर ओम विजय सकपाळ ह्या विद्यार्थ्याने ६३.४०% गुण मिळवित शाळेतून तृतीय येण्याचा मान पटकाविला.

दहावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे शाळेचे संचालक शंकरराव महाडिक, अध्यक्षा मंगलाताई महाडिक, उपाध्यक्ष बाबुराव महाडिक, मनोज महाडिक, शाळेच्या मुख्याध्यापिका प्रतिभा उतेकर यांच्याकडून अभिनंदन करीत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.