माणगांव पोलीस ठाणे हददीत मौजे पाणसई येथे गावठी बॉम्ब व गावठी बॉम्ब तयार कारण्याचे साहित्या सह दोन आरोपी माणगांव पोलिसांकडून अटक

माणगांव पोलीस ठाणे हददीत मौजे पाणसई येथे गावठी बॉम्ब व गावठी बॉम्ब तयार कारण्याचे साहित्या सह दोन आरोपी माणगांव पोलिसांकडून अटक

माणगांव पोलीस ठाणे हददीत मौजे पाणसई येथे गावठी बॉम्ब व गावठी बॉम्ब तयार कारण्याचे साहित्या सह दोन आरोपी माणगांव पोलिसांकडून अटक

✒दिपक दपके ✒
माणगाव शहर प्रतिनिधी
📞9271723603

माणगांव : – मिळालेल्या अधिक माहितीनुसार दिनांक १९/०६/२०२२ रोजी रात्री २३ ०० वाजण्याचे दरम्यान पोशि/ १८९० तांदळे यांना गुप्त बातमी दारा मार्फत बातमी मिळाली की, मौजे पाणसई आदीवासी वाडी ता. माणगांव येथील राहणारा बाबु दगडु जाधव व राम यशवंत वाघमारे वय ४५ रा. विळा आ.वाडी ता.माणगांव जि. रायगड हे रानडुकराची शिकार करण्याकरीता वापरण्यात येणारे गावठी बॉम्ब तयार करतो अशी माहिती गुप्त बातमी दारा मार्फत माहिती प्राप्त झाल्याने मा. पोलीस अधीक्षक सो। श्री अशोक दुधे, मा. अपर पोलीस अधीक्षक सोो श्री अतुल झेंडे मा. उप विभागीय पोलीस अधिकारी सो श्री प्रविण पाटील यांचे मार्गदर्शनाखाली सदर ठिकाणी माणगांव पोलीस ठाण्याचे पोनि श्री राजेद्र पाटील, पोसई श्री गायकवाड, पोसई श्री अघाव, सहा. पोलीस उप निरीक्षक श्री जे. टी. वाटवे, सहा. पोलीस उप निरीक्षक श्री भोजकर, पोह/ श्री कुवेस्कर, पोशि/ ३९९ श्री प्रविण माटे, पोशि/ ४८८ श्री मयुर पाटील, पोशि/ ३६४ श्री विनय पाटील, पोशि/१९०५ श्री डोईफोडे, पोशि/ १८९० श्री तांदळे, पोशि/२२२० श्री दहीफळे, यांनी छापा टाकला असता बाबु दगडु जाधव रा. पाणसई ता. माणगांव यांचे ताब्यात एका प्लॅस्टीकच्या बरणीत ठेवलेले लहान सुपारीचे आकाराचे गावठी बॉम्ब एकुण ८ नग, एका प्लॅस्टीकची पिशवी त्यात सुमारे २ किलो वजनाचे पिवळया रंगाचे काडया व लाल रंगाची पावढर स्फोटक पदार्थ तयार करण्या करता वापरण्यात येत असलेले १०० ग्रॅम वजनाचे प्लॉस्टीकचे पिशवीतील मिळुन आल्याने सदरचे बॉम्ब हे खरे आहेत अगर कसे? या बाबत बॉम्ब स्फोटक पथक अलिबाग- रायगड यांना पाचारण करुन मिळुन आलेल्या बॉम्बची व साहीत्याचे श्वान ब्रुनो याचे कडुन तपासणी करुन खात्री करण्यात आली आहे. मिळुन आलेल्या आरोपीत बाबु दगडु जाधव वय – ५० यांचे कडे गुन्हयाचे तपास कामी चौकशी करता आपल्यास गावठी बॉम्ब तयार करणे करीता माझा साडु राम यशवंत वाघमारे वय ४५ रा. विळा ता. माणगाव हा मदत करतो. तसेच चासलाल पुर्ण नांव माहिती नाही रा. मध्यप्रदेश हा गावठी बॉम्ब तयार करणे करीता लागणारे सामुग्री पुरवीत असतो तसेच स्वतः ही तयार करुन विकत असतो असे सांगीतले असुन त्यांचे विरुध्द माणगांव पोलीस ठाण्यात गुन्हा नंबर १७७ / २०२२ भादविक २८६, ३४, सह स्फोटक अधिनियम सन १९०८ चे कलम ३, ४, ५ अन्वये तारीख २०/०६/ २०२२ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला असुन सदर गुन्हयाचा तपास सपोनि श्री एन. डी. लहांगे हे करीत असुन सदर गुन्हयाचे कामी बाबु दगडु जाधव वय – ५० रा. पाणसई आ. वाडी ता. माणगांव जि. रायगड राम यशवंत वाघमारे वय – ४५ रा. विळा आ.वाडी ता. माणगांव यांना अटक करण्यात आली आहे. चासलाल पुर्ण नांव माहिती नाही. रा. मध्यप्रदेश यांचा शोध घेवून त्याचे अटकेची कार्यवाही करणे कामी माणगांव पोलीस ठाण्याकडील पथक नेमण्यात आले आहे.