भाजपचे प्रसाद लाड, काँग्रेसचे भाई जगताप विजयी.. भाजपची महाविकास आघाडीला पुन्हा एकदा धोबीपछाड
✍अजित दुराफे ✍
मुंबई महानगर प्रतिनिधी
77180 95197
मुंबई : – सविस्तर वृत्त याप्रमाणे आहे की ,
राज्यसभेप्रमाणेच विधानपरिषदेच्या निवडणुकीतही भाजपने महविकास आघाडीला धोबीपछाड देत काँग्रेसचा एक उमेदवार पराभूत केला आहे.
अत्यंत चुरशीने रंगलेल्या विधानपरिषदेच्या निवडणुकीमध्ये भाजपने व पर्यायाने देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा महाविकास आघाडीला पुन्हा एकदा आपली ताकद दाखवुन दिली आहे.
भाजपचे पाचवे उमेदवार प्रसाद तर काँग्रेसचे भाई जगताप विजयी झाले असून चंद्रकांत हंडोरे यांचा पराभव झाला आहे.
या निवडणुकीमध्ये काँग्रेसची तीन मतं फुटली व त्यांना पहिल्या पसंतीची केवळ 41 मतं मिळाली.
मतमोजणीच्या पहिल्या फेरीत एकूण आठ उमेदवारांचा विजय झाला. त्यानंतर नवव्या आणि दहाव्या जागेसाठी भाजपचे प्रसाद लाड विरुद्ध काँग्रेसचे भाई जगताप आणि चंद्रकांत हंडोरे यांच्यात चुरस निर्माण झाली. शेवटी प्रसाद लाड यांनी चंद्रकांत हंडोरे यांचा पराभव केला. त्याचसोबत पहिल्या फेरीत मागे असणारे काँग्रेसचे भाई जगताप हे विजयी घोषित करण्यात आले.
पहिल्या फेरीमध्ये रामराजे निंबाळकर आणि उमा खापरे यांच्या कोट्यातील प्रत्येकी एक मत बाद झाल्यानंतर पहिल्या पसंतीच्या मतासाठी 25.73 चा कोटा ठरवण्यात आला होता. त्यानंतर हा निकाल जाहीर करण्यात आला.
*विधानपरिषदेतील विजयी उमेदवार*
रामराजे निंबाळकर- 28
एकनाथ खडसे- 29
आमश्या पाडवी- 26
सचिन अहिर- 26
प्रवीण दरेकर- 29
राम शिंदे-30
श्रीकांत भारतीय- 30
उमा खापरे- 27
प्रसाद लाड- 28
भाई जगताप- 26