महाराष्ट्रातल्या तरुणांनो, रस्त्यावर उतरून दगड उचलण्याआधी हे वाचा…

 

मनोज कांबळे, २० जून: महाराष्ट्राचे वर्णन करताना आपण नेहमीच शिवाजी महाराज – फुले – शाहू – आंबेडकर यांचा महाराष्ट्र, पवित्र संतांची परंपरा लाभलेला सर्वधर्मसमभाव आणि माणुसकी जपणारा महाराष्ट्र असे करतो. पण गेल्या काही महिन्यांमध्ये महाराष्ट्रातल्या कोल्हापूर, धुळे, संभाजीनगर सारख्या अनेक ठिकाणी धार्मिक तेढ निर्माण होऊन दंगलसदृश्य परिस्थिती उद्भवली होती.अशावेळी कुठल्यातरी राजकीय नेता किंवा स्वतःचा फायदा बघणारे भोंदू धार्मिक गुरु चिथावणीखोर भाषण करतात. या भाषणांना बळी पडतो सर्वसामान्य तरुण वर्ग आणि रस्त्यावर उतरून समोरच्याला उध्वस्त करण्यासाठी तो दगड उचलतो…पण स्वतःचे आयुष्य कायमस्वरूपी जखमी करून घेतो. कसे ?

रस्त्यांवरच्या दंगलीत भाग घेतल्यास तुमच्यावर दाखल होऊ शकतात हे गंभीर गुन्हे…
३५३ कलम – सरकारी कामात अडथळा
४२७ कलम – तोडफोड करणे
१८८ कलम – सरकारी आदेशाचे उल्लंघन
१०९ कलम – गुन्ह्यास उत्तेजन देणं
१४३ कलम – नुकसान घडवून आणणं
१५३ कलम – आक्षेपार्ह पोस्ट फॉरवर्ड करणे

रस्त्यांवरच्या दंगलीत भाग घेतल्यास तुमच्यावर वरील कलमांतर्गत गुन्हे दाखल होऊ शकतात. हे गुन्हे तुमचे शिक्षण आणि करियर कायमस्वरूपी उध्वस्त करू शकतात. ज्या व्यक्तींवर हे गुन्हे दाखल होतात त्यांना आयुष्यात खालील गंभीर अडचणींना सामोरे जावे लागते.
– पासपोर्ट आणि व्हिसा मिळवण्यास असंख्य अडचणी
– सरकारी आणि खासगी नोकरीसाठी लागणारे पोलीस एनओसी मिळण्यात अडचणी येतात.
– अनेक वर्षे कोर्टाच्या पायऱ्या चढाव्या लागल्याने तुमची आणि कटुंबाची सामाजिक प्रतिष्ठा धुळीस मिळते.

https://mediavartanews.com/2023/06/08/kolhapur-riots-latest-news-updates/

म्ह्णून महाराष्ट्रातल्या तरुणांनो, रस्त्यावर उतरून दगड उचलण्याआधी विचार करा, कुठल्यातरी राजकीय नेता किंवा स्वतःचा फायदा बघणारे भोंदू धार्मिक गुरूंच्या हातातले बाहुले बनून जगायचे आहे, कि शिवाजी महाराज – फुले – शाहू – आंबेडकर यांचा आदर्श समोर ठेवून अभिमानाने जगायचे आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here