वर्धा जिल्ह्यातील प्रस्तावित शासकीय वैद्यकीय महाविद्यालय हिंगणघाटला करण्याबाबत २० दिवसापासून धरणे आंदोलन सुरू

51

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय हिंगणघाटला करा, जनतेची मागणी…

मीडिया वार्ता न्युज

वर्धा जिल्हा प्रतिनिधी

वर्धा : – महाराष्ट्र राज्यामध्ये शासनाने घोषित केलेल्या नवीन १२ प्रस्तावित मेडिकल कॉलेज मध्ये वर्धा जिल्ह्याचा समावेश असून हे मेडिकल कॉलेज हिंगणघाट शहरात व्हावे अशी जोरदार मागणी हिंगणघाट येथील वैद्यकिय महाविद्यालय संघर्ष समिती,विद्यार्थी ,नागरिक , सामाजिक स्वयंसेवी संस्था,व्यापारी संघटना, मानवाधिकार सहायता संघ व सर्व राजकीय पक्ष यांनी एकत्रित येऊन पक्षभेद विसरून हिंगणघाट शहराचा विकासासाठी एकमुखाने कॉलेजची मागणी रेटून धरलेली आहे.

ह्या करिता शासनाचे लक्ष वेधून घेण्याकरिता शहरबंद करून जनजागृती रॅली काढली होती. उपविभागीय अधिकारी ते मुख्यमंत्री व राज्यपाल महोदया पर्यंत निवेदने दिलीत.आमदार,खासदार, उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री देवेंद्र फडणवीस व शरद पवार साहेब यांचीही भेट घेऊन चर्चा केली आणि हिंगणघाट ला मेडिकल कॉलेज का हवे हे पटवून देण्यात आले.

https://mediavartanews.com/2023/06/20/pakistan-economy-crisis/

हिंगणघाट- समुद्रपुर तालुक्याची लोकसंख्या आताच्या घडीला ४.५० लाख असून हिंगणघाट येथील उपजिल्हा रुग्णालयात पुरेशी जागा उपलब्ध आहे. हे शहर उत्तर व दक्षिण जाणाऱ्या रेल्वे व राष्ट्रीय महामार्गावर असून चंद्रपूर, नागपूर व यवतमाळ या तीन जिल्ह्यांच्या सीमा लागलेल्या आहे .नागपूर-चंद्रपूर वर्दळीचा महामार्ग ह्याच परिसिमेतून जातो.तेलंगणा राज्याची सीमा जवळच आहे.राज्यातील दुसऱ्या क्रमांकाची कृषी उत्पन्न बाजार समिती हिंगणघाट असून प्रमुख व्यापारी बाजारपेठ आहे.भौगोलिक दृष्टीने हिंगणघाट हे मध्यवर्ती शहर असून ‘अ’ दर्जाची सर्वात जुनी नगरपालिका आहे. असे असूनही व्यावसायिक शिक्षणाच्या दृष्टिकोनातून अत्यंत मागासलेले शहर आहे.येथे कोणत्याही प्रकारचे उच्च व्यावसायिक शिक्षण देणारी कोणतीही संस्था नाही.येथे असलेल्या रुग्णालया मध्ये पुरेश्या सोयी नसल्याने रुग्णालयांना छोट्या छोट्या कारणास्तव बाहेर गावाला पाठवावे लागतात.येथे रुग्णांची संख्या व अपघातग्रस्तांचे प्रमाण अधिक असल्याने तात्काळ उपचारा करिता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय होणे अतिशय महत्त्वाचे आहे.

मेडिकल कॉलेजच्या या मागणी करिता दिनांक २९ मे २०२३ डॉ. आंबेडकर पुतळा समोर सायंकाळी ६.३० ते ९ वाजे पर्यंत बेमुदत धरणे आंदोलन सुरू असून विद्यार्थी ,महिला व पुरुषांच्या मोठ्या प्रमाणात सहभाग दिसून येत आहे .वीस दिवसापासून हे आंदोलन सुरू असून शासन, प्रशासनाने ,स्थानिक लोकप्रतिनिधीने अजून पर्यंत दखल न घेतल्यामुळे ह्या आंदोलनाचा विस्तार ग्रामीण विभागात पसरविण्याचा निर्धार संघर्ष समिती व सर्व पक्षीय आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केलेला आहे.हे मेडिकल कॉलेज अभी नही तो कभी नही अशी भावना नागरिकांची आहे.

आजच्या या धरणे आंदोलनाचा विसाव्या दिवशी विविध घोषणांचे हस्त फलक घेऊन जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यामध्ये विविध क्षेत्रातील महिला व नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद होता.यात मेडिकल कॉलेज संघर्ष समितीचे अध्यक्ष सुनील पिंपळकर, कार्याध्यक्ष वासुदेव पडवे,सहकार्याध्यक्ष जगदीश वांदिले, माजी आमदार राजुभाऊ तिमांडे, अतुलभाऊ वांदिले, पंढरीनाथ कापसे,अक्षय बेलेकर, गजानन नांदुरकर,राजू मुडे,अजय परबत,सुनील भुते ,सतीश धोबे,श्याम इडपवार,दशरथ ठाकरे,प्रलय तेलंग,अनिल भोंगाडे,अनिल जवादे,प्रविन उपासे,गजु कुबडे,सुरेंद्र बोरकर, गजानन काटवले,गुणवंत कारवटकर त्यासह महिलांनमध्ये चंदा येलेकर, विद्या गिरी, सीमा तिवारी,अनिता राऊत,सोनाली लसने, बेबी बोरकुटे,रत्नमाला टापरे, माधुरी मालेकर, पौर्णिमा मस्के,अर्चना नांदुरकर,पल्लवी घोडे,अश्विनी चौधरी,सविता मैत्रे,वैशाली वानकर,शुभांगी मैत्रे,अर्चना रोंघे,ज्योती धोपटे,नंदा गोंडाने,मृणालिनी शेंडे,सुनीता सेनाड, मुक्ता मडावी,गीता मेश्राम,स्नेहा निमगडे, अल्का मानवटकर,पल्लवी घोडे, ज्योत्स्ना बावणे,वैशाली ठाकरे,सविता मेघे,अविनाश धोटे,अनिल भुते,सुरेंद्र टेंभुरणे,जावेद मिर्झा,नदीम अली,रवी कुटे,प्रवीण श्रीवास्तव,शाहरुख बक्ष,संतोष विहिरकर,मुघल शेख,रफिक पत्रकार,हर्षल गुंडे,दिनेश धोटे,रुपेश काटकर,सुधाकर बंगाले,प्रशांत मेश्राम डॉ.जगताप,नरेश खडगी,पंकज भट, गजानन महाकालकर,निशिकांत सिंगरू इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.