बेलोशी ग्रामपंचायत मार्फत मोफत ‘क्लोरोजल’ वाटप

बेलोशी ग्रामपंचायत मार्फत मोफत ‘क्लोरोजल’ वाटप

ग्राम विकास अधिकारी शैलेश नाईक यांचा पुढाकार

अँड.रत्नाकर पाटील
रायगड ब्यूरो चीफ
९४२०३२५९९३

अलिबाग:- बेलोशी ग्रामपंचायत हद्दीतील नागरिकांचे आरोग्य चांगले राहावे, दूषित पाण्यामुळे जलजन्य आजार होऊ नये म्हणून बेलोशी ग्रामपंचायतीने पुढाकार घेतला आहे. ग्रामपंचायत हद्दीतील नागरिकांना मोफत क्लोरोजल वाटप करण्यात करण्यात आले आहे. शुध्द पाण्यासाठी नागरिकांना क्लोरोजलचा आधार मिळाला आहे.

बेलोशी ग्रामपंचायत हद्दीत महाजने, बेलोशी, वावे, मल्याण, घोटवडे वळवली या गावांसह पाटवाडी, मठवाडी, सागवाडी, बौध्दवाडी, दिवीवाडी आदी वाड्यांचा समावेश आहे. ग्रामपंचायत हद्दीत सहा हजारहून अधिक लोकसंख्या आहे. या गावे, वाड्यांना उमटे धरणातून पाणी पुरवठा होतो. सध्या पावसाळी हंगाम आहे. पावसाचे पाणी सध्या गढूळ येत आहे. मातीमिश्रित पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य बिघडण्याची भीती आहे. मातीमिश्रित पाण्यामुळे जलजन्य आजार होऊ नये, म्हणून ग्रामपंचायतीच्या वतीने क्लोरोजल वाटप सुरू करण्यात आले आहे. ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी शैलेश नाईक यांच्या पुढाकाराने हा उपक्रम हाती घेण्यात आला असून, ग्रामपंचायत कर्मचारी घरोघरी जाऊन नागरिकांना क्लोरोजल वाटप करीत आहेत. क्लोरोजल वाटप करीत असताना पाण्यामध्ये एक ते दोनच थेंब टाकण्यात यावे अशा सूचनादेखील केल्या जात आहेत.