वीज ग्राहकांना अतिरिक्त सुरक्षा अनामत रक्कम न भरण्याचे भिवंडी खासदारांचे आवाहन

वीज ग्राहकांना अतिरिक्त सुरक्षा अनामत रक्कम न भरण्याचे भिवंडी खासदारांचे आवाहन

अभिजीत आर. सकपाळ
ठाणे / भिवंडी प्रतिनिधी
9960096076

भिवंडी :- भिवंडी क्षेत्रातील टोरंट पॉवर कंपनी कडून वीज वितरण केल्या जाणाऱ्या वीज ग्राहकांना वीज बिलासोबतच अतिरिक्त सुरक्षा रक्कम भरण्या बाबत पत्र दिले गेले आहे, त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. याबाबत नागरिकांनी भिवंडीतील खासदार सुरेश (बाळ्या मामा) गोपीनाथ म्हात्रे यांच्या कडे तक्रार करताच त्यांनी गंभीर दखल घेत वीज ग्राहकांनी अतिरिक्त सुरक्षा अनामत रक्कम भरू नये असे आवाहन सोशल मीडियावर निवेदनाद्वारे वीज ग्राहकांना केले आहे.कोणत्याही विभागाकडून किंवा टोरंटच्या अधिकाऱ्यां कडून अनामत रक्कम भरण्यासाठी जबरदस्तीने केल्यास माझ्याशी वैयक्तिक अथवा माझ्या कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन खाजदार सुरेश (बाळ्या मामा) गोपीनाथ म्हात्रे यांनी केले आहे. टोरंट हटाव हे माझ्या लोकसभा निवडणुकीतील आंदोलनात्मक आश्वासन होते. मला त्याचा विसर पडलेला नाही आणि तो लढा सुद्धा थांबलेला नाही अशी माहिती खाजदार सुरेश (बाळामामा) गोपीनाथ म्हात्रे यांनी दिली