सिंदेवाही पोलीस स्टेशन येथे रक्तदान शिबीर संपन्न
जितेंद्र नागदेवते
सिंदेवाही प्रतिनिधी
8806689909
सिंदेवाही :- चंद्रपुर जिल्ह्यामध्ये रक्ताचा तुटवडा भासत आहे. शहरासह ग्रामीण भागातील अनेक रुग्णांना आवश्यक वेळी तत्काळ रक्तपुरवठा करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो.व रुग्णालयात रुग्णांना रक्ताची गरज भासल्यास इतरत्र फिरावे लागू नये त्यांना त्वरित रक्त मिळावे, यासाठी
पोलीस अधीक्षक चंद्रपुर मुम्मका सुदर्शन ,अप्पर पोलिस अधिक्षक चंद्रपुर,उपविभागीय पोलिस अधिकारी ब्रम्हपूरी यांच्या मार्गदर्शनाखाली दि.१९ जून २०२५.ला सिंदेवाही पोलीस स्टेशन येथे पोलिस निरीक्षक विजय राठोड यांच्या नेतृत्वात भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले.
सदर शिबीरास सिंदेवाही तालुक्यातील ३८ रक्तदात्यांनी रक्तदान केले.
या शिबिराच्या यशस्वीतेसाठी सिंदेवाही तालुक्यातील पोलीस पाटील संघटना,,सिंदेवाही तालुका पत्रकार संघटना,विविध सामाजिक संघटना,सिंदेवाही व्यापारी असोसिएशन ,सामाजिक कार्यकर्ता मंडळींसह आदिंनी रक्तदानासाठी मोलाचे सहकार्य केले.
रक्तदान शिबीराच्या यशस्वी आयोजनासाठी सिंदेवाही पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक विजय राठोड,
पोउपनि सागर महल्ले , गोपनीय अधिकारी कमलेश फेंडर,तसेच सर्व पोलिस कर्मचारी सिंदेवाही , चंद्रपूर रक्तपेढीचे डॉ. मिलिंद झाडे, डॉ. हरफूल चौधरी ,अमोल रामटेके,,डॉ. साक्षी मोह्रुले, रूपेश घूमे व त्यांचे सर्व सहकारी आदींनी परिश्रम घेतले.