खनिज विकास निधीच्या वाटपाबाबत शासकीय विश्रामगृहावर आयोजित सभेत पालकमंत्र्यांच्यासमोर काँग्रेसचे आजी-माजी शहराध्यक्ष भिडले.

संदीप तूरक्याल
चंद्रपूर शहर प्रतिनिधी
मिडीया वार्ता न्यूज चंद्रपूर
आज सोमवारी सायंकाळच्या सुमारे चार तास सगळे पदाधिकारी पालकमंत्री यांची वाट बघत होते पण तिवारी यांच्या समर्थकांमुळे मिटिंग रद्द झाल्याने इतर पदाधिकारी नाराज झाले आणि आता दोन्ही आजी माजी अध्यक्ष हिराई रेस्ट हाऊसला पालकमंत्री यांना भेटायला गेले असल्याचे कळते.
सविस्तर माहितीनुसार आज दिनांक 19 जुलै ला खनिज विकास निधीच्या वाटपाबाबत काँग्रेस नगरसेवकांची विश्रामगृहावर बैठक होती. येत्या काही महिन्यांवर चंद्रपूर मनपाची निवडणूक होणार आहे. निवडणूक समोर काँग्रेसच्या नगरसेवकांना निधीचे वितरण करण्याबाबत या बैठकीत चर्चा करण्यात आली. या बैठकीत विद्यमान नगरसेवकांसोबतच माजी नगरसेवकांच्या वॅार्डात निधी देण्याच्या मुद्य्यावर चर्चा सूरू होती.
त्यातच काँग्रेसचे विद्यमान शहराध्यक्ष रामू तिवारी यांनी माजी नगरसेवकांची यादी पालकमंत्र्याकडे सादर केली. त्यावर माजी शहराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक नंदू नागरकर यांनी आक्षेप घेतला. यावर तिवारी यांनीही आक्षेप घेत शिवीगाळ सूरू केली.या नंतर दोघांनीही एकमेकांना धमक्या देणे सूरू केले की दोघांनाही पालकमंत्र्यांच्या उपस्थिती चे भान राहिले नव्हते.
प्रासांगिक भान ठेवत उपस्थितीत नगरसेवकांनी आणि पदाधिकाऱ्यांनी दोघांनाही समजाविण्याचा प्रयत्न केला. परंतु वाद एवढा विकोपाला गेला होता की कुणीच एोकण्याच्या तयारीत नव्हते. शेवटी पालकमंत्र्यांनाच हस्तक्षेप करावा लागला.
यात मिळालेल्या माहिती नुसार शहर अध्यक्ष रामू तिवारी यांच्या एका समर्थकाने माजी शहराध्यक्ष नंदू नागरकर यांना धमकावून मारण्याचा प्रयत्न केला आता मुद्दा यात असा की तिवारी यांचा हा समर्थक नगरसेवकांच्या मिटिंग मध्ये कसा उपस्थित होता??त्यांचा हा समर्थक ना पदाधिकारी आहे ना नगरसेवक. नगरसेवक व पालकमंत्री शहराध्यक्ष यांची मिटिंग खासगीत सुरू असतांना असे हुजरे रामू तिवारी यांनी जाणीवपूर्वक ठेवले.
पालकमंत्री यांनी लक्ष घातले नसते तर तिवारी यांचे हे कथाकथिक गुंड हनामारीवर आले असते. खासगीत मिटिंग सुरु असतांना पण तिवारी यांनी आपले हे हुजरे मिटिंग मध्ये ठेवले एवढेच नाही तर त्याना चिथावणी दिली आणि शेवटी पदाधिकऱ्यांची मिटिंग रद्द झाली. जी यादी रामु तिवारी यांनी दिली त्यात अनेक माजी नगरसेवकांची नावे नव्हती म्हणून या विषयावरून वाद झाला शेवटी पुन्हा एकदा काँग्रेस चा विषय चव्हाट्यावर आल्याने सगळीकडे ही एकच चर्चा आज सुरू आहे.
मनपा निवडणूक तोंडावर असताना अश्या प्रकारे आजी माजी शहराध्यक्ष्याचा संघर्ष रामू तिवारी यांच्या नाकर्ते पणामुळे शहरात काँग्रेस कार्यकर्त्यातील निष्क्रियतेचे रूपांतर हाणामारीचे स्वरूप घेणे म्हणजे आधीच पालकमंत्री-खासदार असे दोन गट पडलेल्या काँग्रेस चे ग्रहण अधिकच वाढत असल्याचे एकंदरीत चित्र आहे.