महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय शाळेचा स्तुत्य उपक्रम* *शिक्षकांच्या पुढाकारातून विद्यार्थ्यांना घरपोच पुस्तकांचे वाटप*

*महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय शाळेचा स्तुत्य उपक्रम*

*शिक्षकांच्या पुढाकारातून विद्यार्थ्यांना घरपोच पुस्तकांचे वाटप*

महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय शाळेचा स्तुत्य उपक्रम* *शिक्षकांच्या पुढाकारातून विद्यार्थ्यांना घरपोच पुस्तकांचे वाटप*
महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय शाळेचा स्तुत्य उपक्रम*
*शिक्षकांच्या पुढाकारातून विद्यार्थ्यांना घरपोच पुस्तकांचे वाटप*

संतोष मेश्राम✍
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
( ग्रामीण )-9923497800

राजुरा

दिनांक 20/7/2021

महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय राजुरा येथील शिक्षकांनी पुढाकार घेऊन विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन पुस्तके वाटप करण्याचा उपक्रम शुरू केला आहे.

कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे विद्यार्थ्यांना शिक्षणापासून मागील दोन वर्षापासून वंचित राहावे लागत असून ऑनलाईन च्या शिक्षणासाठी अनेक गरीब पालकांकडे स्मार्ट फोन नसल्याने मुला, मुलींना शिक्षणापासून वंचित राहावे लागत आहे. ही बाब लक्षात घेऊन पालकांच्या घरी जाऊन पाल्यांना पुस्तके वाटप करून शिक्षकांनी नवीन आदर्श निर्माण केला आहे. तसेच पालकांशी अभ्यासा बद्दल चर्चा ,मार्गदर्शन करण्याचे कार्य शिक्षक करीत आहेत.

ज्योतिबा फुले विद्यालय राजुरा येथे तालुक्यातील अनेक खेडे गावातील मुले शिक्षण घेत असून कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे शाळा बंद पडल्या आहेत विद्यार्थ्यांचे शैक्षणिक प्रगती विस्कळीत झाली आहे. याची दखल घेत शिक्षकांनी पालकाच्या घरी जाऊन मार्गदर्शन करण्याचा काम शिक्षक करीत आहेत.

शाळेचे शिक्षक मडावी सर, काळे सर, निमकर सर, मेंढे सर, परचाके सर, पेंदोर सर, मेश्राम सर, वैरागडे सर, निखाडे सर, जूंघरे सर यांनी हा उपक्रम राबवून विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात ठेवण्याचा कार्य करीत आहेत.