पोर्ण मुवी बनवणाच्या आरोपात अभिनेत्री शिल्पा शेट्टीचे पती प्रसिद्ध उद्योगपती राज कुंद्रा अटक.

नीलम खरात✒
मुंबई महानगर प्रतिनिधी
9136879930

मुंबई,दि.20 जुलै:- हिंदी चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा शेट्टीचे पती आणि प्रसिद्ध उद्योगपती राज कुंद्रा यांना अटक करण्यात आल्याची माहित समोर आली आहे. मुंबई पोलीसांच्या गुन्हे शाखेनं त्यांना एका प्रकरणात चौकशीसाठी बोलवल होते. चौकशी नंतर मात्र, राज कुंद्रा यांच्या अटक केल्याची माहिती समोर येत आहे.

एका प्रकरणात राज कुंद्रा यांचं नाव समोर आलं होतं. आज दिवसभर त्यांची चौकशी झाली. त्यानंतर त्यांना गुन्हे शाखेनं अटक केली.

एएनआयने दिलेल्या माहितीनुसार,फेब्रुवारी महिन्यात मुंबई पोलिसांकडे पोर्ण मूवी रेकॉर्ड करणे आणि ते प्रसिद्ध केल्याप्रकरणी तक्रार दाखल झाली होती. याप्रकरणी जवळपास 7 ते 8 तास चौकशी केल्यानंतर सोमवार दि 19 ला संध्याकाळी कुंद्रा यांना अटक करण्यात आली, मुंबई पोलिसांनी या प्रकरणी आपल्याकडे अधिक पुरावे असल्याचं सांगत राज कुंद्रा यांना अटक केली.

पोर्ण मूवीची निर्मिती करून या मूवीला काही मोबाईल ऑनलाइन अॅप्सवर प्रदर्शित केल्या जात असल्याचं प्रकरण काही महिन्यांपूर्वी पोलिसांनी उघडकीस आणलं होतं. या प्रकरणात पोलिसांनी एका अभिनेत्रीलाही अटक केली होती. याच प्रकरणात आता राज कुंद्रा यांचं नाव समोर आल होते त्यामुळे कुंद्राला ही अटक झाली आहे.