लाचेची मागणी करणारा तलाठी अडकला सापळ्यात 25000 रुपयांची दुसऱ्या हप्त्यात केली होती मागणी

खुशाल सूर्यवंशी 

राजुरा तालुका प्रतिनीधी 

8378848427

राजुरा तहसील कार्यालयातील तलाठ्यास लाच घेताना रंगेहाथ अटक केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली असुन तालुका मुख्यालयापासून अवघ्या 10 किमी अंतरावर असलेल्या वरूर रोड येथील त लाठी विनोद गेडाम ह्यांना रेती तस्करीत पकडलेल्या ट्रकला सोडून देण्यासाठी मागण्यात आलेल्या लाचेचा दुसरा हप्ता घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचुन अटक केल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

प्राप्त माहितीनुसार वरूर रोड येथील तलाठी विनोद गेडाम ह्यांनी 8 फेब्रुवारी रोजी रेती तस्करी करणारा एक ट्रक पकडला मात्र हा ट्रक नियमानुसार तहसील कार्यालयात जमा करून कायदेशीर कारवाई न करता संबंधित तलाठ्याने ट्रक मालकास 70000 रुपयांची मागणी केली. ट्रक मालकाने त्याच वेळी 35000 रुपये दिल्याने ट्रक सोडण्यात आला व उर्वरित रक्कम नंतर देण्याचे ठरविण्यात आले.

तलाठी व ट्रक मालक ह्यांत तडजोड होऊन 25000 रुपये नंतर देण्याचे मान्य करण्यात आले मात्र ट्रक मालकाला लाचेची उर्वरित रक्कम देणे मान्य नसल्याने त्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला तक्रार नोंदविली. प्राप्त तक्रारीवरून ला प्र विभागाने सापळा रचुन आज दिनांक 19 जुलै रोजी संबंधित तलठ्यास लाच मागण्याचा गुन्हा नोंदविण्यात आला असुन बातमी लिहीत पर्यंत विरुर स्टे. पोलीस ठाण्यात कारवाई सुरू आहे.

सदरची यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला, ला.प्र.वि. नागपूर ह्यांच्या कुशल मार्गदर्शनात मधुकर गिते, अपर पोलीस अधीक्षक, ला प्र वि नागपूर. मा. श्री. अविनाश भामरे, पोलीस उप अधीक्षक, ला. प्र. वि. चंद्रपूर ह्यांच्या नेतृत्वातील पो.उपअधीक्षक अविनाश भामरे, नापोशि नरेशकुमार नन्नावरे, पो. शि. रोशन चांदेकर , रवी ढेंगळे, संदेश वाघमारे, मेघा मोहुर्ले सर्व ला.प्र.वि. चंद्रपूर. चालक पो. शि.सतिश सिडाम, ला.. प्र. वी. चंद्रपूर ह्यांच्या चमूने पुर्णत्वास नेली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here