विळे येथील सुप्रसिद्ध डॉ नितीन मोदी याच्या मोदी क्लिनिक चा आज ३५ वा वर्धापण दिन उत्साहात संपन्न 

45

३५ वर्ष अविरत वैद्दकीय सेवा देणारे विळे येथील सुप्रसिद्ध डॉ नितीन मोदी याच्या मोदी क्लिनिक चा आज ३५ वा वर्धापण दिन उत्साहात संपन्न 

मंगेश मेस्त्री

निजामपूर विभाग प्रतिनिधी

मो: 99238 44308

माणगांव:- माणगांव तालुक्यातील विळे येथील नामांकित डॉक्टर नितीन मोदी यांनी विळे येथें दवाखाना सुरु करून आज ३५ वर्ष पूर्ण झाली कोरोनाच्या महामारीच्या जागतिक संकटसमयी लॉकडाऊन च्या काळात सर्वजण आप आपल्या घरात शासनाला सहकार्य करण्यासाठी थांबलेली असताना कोविडशी सामना करण्यासाठी स्वतः चा व आपल्या कुटूंबाचा जीव धोक्यात घालून डॉ मोदी यांनी वैद्यकीय सेवा करून मदत केली व रात्र -दिवस समाजाची सेवा करून कर्त्यव्य बजावलं त्याच्या या धाडसाचे कौतुक करून त्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले.

निजामपूर परिसर व विळे पचक्रोशीतुन त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे, डॉ पदवी घेऊन शहरात जाण्यापेक्षा गावात राहून वैद्यकीय सेवा देणाऱ्या डॉ मोदी यांनी गावातील रुग्णासाठी अनेक वेळा रक्तदान शिबीर भरले व स्वतः ही अनेक वेळा रक्तदान केले तसेच आजही करतात. डॉ नितीन मोदी हे निजामपूर भागातील स्वातंत्र् सैनिक धनजी भाई मोदी याचे चिरंजीव असून आपल्या वडिलांचा वारसा जपत ते वाटचाल करित आहेत वडिलांनी देश सेवा केली तर डॉ मोदी गेली ३४ वर्ष जनतेची अल्प दरात सेवा करीत आहेत ऊन वारा पाऊस याचा विचार नकारता अडचणीच्या वेळी यापूर्वी कोणतेही साधन नसताना देखील गावागावात जाऊन त्यांनी लोकांची सेवा केली आहे, रुग्णसेवा हिच ईश्वर सेवा डॉ मोदी यांच्याकडे ऐकावयास मिळते.

आज त्यांच्याकडे विळे परिसरातील ६०/७० गावे आहेत, प्रत्येक गावात जाऊन ते आपली जनसेवा पुरावीत असत डॉ मोदी याच जन्म बेळगाव पुणे येते झाले आहे ते डॉक्टरकीच्या व्यतिरिक्त सामाजिक क्षेत्रातही कार्यरत आहेत कार्यत्परता सूक्ष्म निरीक्षक कृती सुनियोजन व उपक्रमशील संघटक म्हणून ते ओळखले जातात. परिसरातील वेग वेगळ्या क्षेत्रात ते पदाधिकारी म्हणून कार्यरत आहेत विळे परिसरातील काही मान्यवर याच्या स्थानिक ग्रामस्थांच्या सहकार्याने ही.म. मेथा विद्यालयाची निर्मिती करण्यासाठी त्यांनी मोलाची भूमिका बजावली आहे.सध्या ते ही. म.मेथा विद्यालयात संचालक पदावर कार्यरत आहेत तसेच भैरवनाथ ज्ञान प्रसारक मंडळावर सद्यस्त म्हणून कार्यरत आहेत.