सोईट व करंजी गाव खाली करणार, एसडीआरएफची चमू वरोड्यात दाखल

52

सोईट व करंजी गाव खाली करणार, एसडीआरएफची चमू वरोड्यात दाखल

अश्विन गोडबोले

चंद्रपूर महानगर प्रतिनिधी

वरोडा, 19 जुलै 

संततधार पावसामुळे वरोडा तालुक्यातील अनेक गावांना पुराचा फटका बसला असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. काही गावांचा तालुक्याशी संपर्क तुटला असून नागरिकांच्या घरात पाणी शिरले आहे. पूरग्रस्तांच्या मदतीसाठी नागपूर येथील एसडी आरएफची चमू वरोडा येथे दाखल झाली आहे.

पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्था व कार्यकर्ते समोर येत आहेत. या पार्श्वभूमीवर नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविणे, त्यांच्या भोजनाची व्यवस्था करणे ,त्यांना आवश्यक साहित्याचा पुरवठा करणे यासाठी तहसिलदार रोशन मकवाणे व त्यांची चमू अथक परिश्रम घेत आहेत. 

प्रशासनाच्या या कार्यास स्वर्गीय श्रीनिवास शिंदे मेमोरियल रविंद्र शिंदे चॅरिटेबल ट्रस्ट मदत करणार आहे. याबाबत ट्रस्टचे अध्यक्ष रवी शिंदे यांनी तहसिलदार रोशन मकवाने यांचेशी संपर्क साधला असून वेळप्रसंगी वरोडा येथे पूरग्रस्तांसाठी निवास व भोजनाची व्यवस्था करण्याचे आश्वासन तहसिलदारांना शिंदे यांनी दिले आहे.

रविंद्र शिंदे यांनी कोविड १९ प्रमाणेच नागरिकांना मदत करण्याची तयारी दर्शवली आहे आज स्व. श्रीनिवास शिंदे मेमोरियल ट्रस्ट तर्फे सोईट येथील पूरग्रस्तांसाठी पिण्याच्या पाण्याच्या २०० कॅन पाठविण्यात आल्या आहेत . या कार्यात सामाजिक बांधिलकी जपत माफक दरात ओझ अक्वाचे महेश भिवदरे यांनी १०० तर संदीप निखारे यांनीही १०० कॅन ट्रस्टला उपलब्ध करून दिले आहे.तहसिलदार रोशन मकवाने यांच्या मदतीच्या आवाहनाला शिंदे यांनी प्रतिसाद दिला आहे.