पोलीस दलाकडून भव्य कृषी मेळाव्याचे आयोजन

महेश बुरमवार

ता. प्रतिनिधी मुलचेरा

मो.न. 9579059379

आज दि.19/07/2022 रोजी गडचिरोली पोलीस दल यांचे तर्फे व पोलीस स्टेशन अहेरी यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रा.पं.चुटूगुंटा येथे भव्य क्रूषी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.

याप्रसंगी कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून श्री मा.तलांडे सर निवडणूक नायब तहसीलदार मुलचेरा, अध्यक्ष कु.साधनाताई मडावी सरपंच ग्रा.पं.चुटूगुंटा, प्रमुख पाहुणे मा.श्री मुल्ला सर पो.उपनिरीक्षक अहेरी, मा.श्री चिदंमवार सर तलाठी लगाम माल, कु.अरुणा कुसनाके ग्रा.पं.सदस्या,श्री सागर मडावी ग्रा.पं.सदस्य, श्री ईश्वर उरेते पेसा अध्यक्ष चुटूगुंटा, श्री आनंदराव जी वेलादी प्रतिष्ठित नागरिक माजी पो.पा, श्री राठोड भाऊ पशुवैद्यकीय वेटरनरी, श्री जे.के.कुमरे ग्रामसेवक चुटूगुंटा व गावातील सर्व पुरुष व महिला मंडळी, तसेच ग्रा.पं.चे सर्व कर्मचारी व पोलीस विभागाचे सर्व कर्मचारी उपस्थित होते.

सदर कार्यक्रमात तलांडे साहेब आणि चिदंमवार सर यांनी क्रूषी व महसूल योजनांविषयी विविध माहिती देऊन मार्गदर्शन केले, तसेच मुल्ला सर पो.उ.नि. यांनी क्रूषी विभाग,पोलीस विभाग व इतर शासकीय योजनांची माहिती दिले व मोलाचे मार्गदर्शन केले,राठोड भाऊ वेटरनरी यांनी पशुवैद्यकीय योजनांची माहिती दिली,

सरपंच कु.साधना मँडम यांनी सुद्धा शासनाच्या विविध योजनांचा लाभ लोकांनी घ्यावे याविषयी मार्गदर्शन केले., या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदीप बुरमवार यांनी केले,.त्यानंतर सुरेश भाऊ मडावी पो.पा.चुटूगुंटा यांनी सर्वांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here