माणगांव मध्ये चोराचा धुमाकूळ चालत्या गाडीतून वाहन चालकांच्या डोळ्यात मसाला टाकून बॅग लपास

56

माणगांव मध्ये चोराचा धुमाकूळ चालत्या गाडीतून वाहन चालकांच्या डोळ्यात मसाला टाकून बॅग लपास

सचिन पवार

माणगांव तालुका प्रतिनिधी

मो: ८०८००९२३०१

माणगांव :- माणगांव तालुक्यातील मोर्बा गावच्या हद्दीत काळ दिनांक १८ जुलै रोजी २१.३० वाजण्याच्या सुमारास मोर्बा ते साई जुना रोड च्या हद्दीत वरील तारखेस रात्री आपलं मोर्बा येथील दुकान बंद करून रोख रक्कम बॅगेत ठेवून स्वतः ची गाडी क्र एम एच ०६ बी एम १६०१ ही चालू करून गाडीच्या डाव्या साईड सीटवर आपली पैशाची बॅग ठेवून गाडी चालवीत मोर्बा ते साईकडे जाणारे जुने रोड वर आले असता रोड वर त्यांना नायलॉन ची जाडी रस्सी आडवी बांधलेली असल्याचे दिसूल आले.

फिर्यादी रवींद्र दत्तात्रय अधिकारी वय वर्ष ४० रा साई कोडं ता माणगांव यांनी आपली गाडी थांबवली असता गाडी जवळ एक अज्ञात इसम यांनी फिर्यादी रवींद्र अधिकारी याच्या डोळ्यात मसाला पावडर मारून त्याच्या हातात असलेल्या चाकू च्या साह्याने वार केला व गाडीमध्ये असलेली बॅग घेऊन फरार झाला.

सदर मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी रवींद्र अधिकारी यांनी माणगांव पोलीस स्टेशनं ला दिलेल्या माहितीनुसार त्याच्या बॅगेत रोख रखम ९२ हजार व एक काळ्या रगांची बॅग गळ्यात अडकवण्या करिता पट्टी असलेला जु. वा.की.अं अश्या पद्धतीचा ऐवज लपास केला असता माणगांव पोलीस स्टेशनं मध्ये गुन्हा कॉ गु रजि नं २०७/२०२२ भा द वि कलम ३४१,३९४ प्रमाणे वरील तपास माणगांव पोलीस उपविभागीय श्री प्रवीण पाटील व पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील याच्या नेतृत्वखाली स पो नि लहागे व स पो नि मोहिते सह फौंज भोजकर हे करित आहेत