महाराष्ट्रात महिला बेपत्ता होण्याचे प्रमाण का वाढते ? ते पहा…
प्रकाश नाईक
जिल्हा प्रतिनिधी नंदुरबार
मो. 9511655877
नंदुरबार : प्रा. डॉ. सुधीर अग्रवाल
महाराष्ट्रात महिला बेपत्ता होण्याचे प्रमाण सतत वाढत आहे. राज्यात जानेवारी २०२३ ते मे २०२३ या पाच महिन्याच्या कालावधीत ५६१० महिला व मुली बीपत्ता झाल्या आहेत महाराष्ट्रात दररोज सरासरी ७० महिला बेपत्ता होत आहे अशी धक्कादायक आकडेवारी काँग्रेसचे आमदार अनिल देशमुख यांनी विधानसभेत सादर केली.
पुण्यातून गेल्या सात महिन्यांत २२०० महिला बेपत्ता झाल्या आहेत.
कौटुंबिक कलह, प्रेमप्रकरणामुळे बहुतांश महिलांनी घर सोडल्याचे सामोरं आले आहे.
विशेष म्हणजे महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातून महिला बेपत्ता होण्याच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. जिल्ह्यात गेल्या ७ महिन्यांत ८४० महिला बेपत्ता झाल्या आहेत. जिल्हा पोलिसांनी सन २०२२ मध्ये दिलेल्या आकडेवारीनुसार, वर्षाच्या पहिल्या सात महिन्यांत ८४० महिला बेपत्ता झाल्याची नोंद झाली आहे. त्यापैकी आतापर्यंत ३९६ महिलांचा शोध लागला आहे. जून महिन्यात सर्वाधिक १८६ महिला बेपत्ता झाल्याची नोंद झाली आहे. त्यानंतर मे महिन्यात १३५ महिला बेपत्ता झाल्या होत्या.पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत ८८५ महिला बेपत्ता झाल्या आहेत. पुणे ग्रामीण पोलिसांनी या कालावधीत ७४३ महिला बेपत्ता झाल्याची नोंद केली आहे.
महिला का गायब होत आहेत ?
पोलिसांच्या म्हणण्यानुसार, महिला घरातून अचानक गायब होण्याच्या घटनाही त्यांच्यासाठी चिंतेचा विषय बनल्या आहेत. या बेपत्ता प्रकरणांमध्ये बहुतांश महिलांनी कौटुंबिक कलहामुळे आणि नोकरीच्या शोधात घर सोडले आहे. मात्र, नंतर अनेकांना आपली चूक लक्षात आली आणि ते घरी परतले. बहुतांश महिला१६ ते २५ वयोगटातील आहेत. घरगुती भांडणामुळे किंवा घरातील सदस्यांशी वारंवार होणाऱ्या भांडणामुळे ज्यांनी घर सोडले होते.
मानवी तस्करीचाही संशय!
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बेपत्ता झालेल्या अनेक महिला या मानसिकदृष्ट्या विकलांग आहेत. त्याच वेळी, या क्षेत्रात काम करणारे सामाजिक कार्यकर्ते आणि स्वयंसेवी संस्था, अशा प्रकरणांचा संबंध मानवी तस्करीशी जोडतात. कौटुंबिक वाद, प्रियकर प्रेमात अडकणे, बेकायदेशीर संबंध अशा कारणांमुळे अशा घटनांमध्ये गायब झालेल्या महिला अनेकदा घडत असल्याचे पोलिसांचे मत आहे. त्याचबरोबर प्रत्येक महिलेला वाचवण्यासाठी पोलीस सर्वतोपरी प्रयत्न करतात.
महिलांना मुक्त जीवन जगायचे आहे.
अनेक महीलांना स्वतंत्र जीवन जगायचे असल्याने तिने घर सोडल्याचे समोर आले आहे.घरच्यांच्या रूढीवादी आणि पारंपारिक विचार.महिलांना मान्य नाही.त्याचबरोबर अनेक घटनांमध्ये महिलांचेही अपहरण होत असल्याचे पोलिसांनी मान्य केले आहे.
महाराष्ट्रात गेल्या तीन जण महिन्यांत ५ हजार ६१०मुली बेपत्ता झाल्या आहेत. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी विशेष एसआयटी स्थापन करण्याची विनंती गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. रुपाली चाकणकर यांनी पोलीस बेपत्ता विभागाच्या प्रमुखांना पत्र लिहून मुली व महिला बेपत्ता झाल्याची सविस्तर माहिती दिली आहे.
काही दिवसांपूर्वी ‘द केरळ स्टोरी’ चित्रपटाबाबत देशात वातावरण तापले असताना मार्च महिन्यात राज्यातील २२०० मुली बेपत्ता झाल्याची धक्कादायक आकडेवारी समोर आली होती. तसेच महाराष्ट्रातून गेल्या तीन महिन्यांत ५६१० मुली बेपत्ता झाल्या आहेत. दरम्यान, महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी मुली आणि महिला बेपत्ता होण्याचे प्रमाण चिंतेची बाब असल्याचे म्हटले आहेत.