पोंभुर्णा वनपरिक्षेत्रात वाघिणीचा मृत्यू…

52

पोंभुर्णा वनपरिक्षेत्रात वाघिणीचा मृत्यू

अश्विन गोडबोले

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

मो: 8830857351

पोंभुर्णा,20 जुलै:मध्य चांदा वनविभागांतर्गत येणार्‍या पोंभुर्णा वनपरिक्षेत्रात गुरुवार, 20 जुलै रोजी दुपारी 4 वाजताच्या सुमारास एक वाघीण मृतावस्थेत आढळून आली.

बेंबाळ येथील काही नागरिकांनी गावाजवळ एक वाघीण असल्याची माहिती वनविभागाला दिली. माहिती कळताच स्थानिक वन कर्मचार्‍यांनी त्या ठिकाणी जावून पाहणी केली. तेव्हा सकाळी वाघिणीचा वावर दिसून आला व तो जखमी असल्याचे दिसून आले. चंद्रपूर येथील पशुवैद्यकिय अधिकार्‍यांना पाचारण करून वाघिणीची पाहणी केली असता दुपारी 4 वाजता ती मृत पावल्याचे निष्पन्न झाले. ही घटना पिपरी दीक्षित नियतक्षेत्रातील कक्ष क्रमांक 543 येथे घडली. वाघाच्या मृत्यूचे कारण शवविच्छेदन अहवालनंतरच सांगता येईल, असे वनविभागाने कळविले आहे.