आमदाराच्या वाढदिवसाचा बॅनर लावताना कंरट लागुन इसमाचा मृत्यू

आमदाराच्या वाढदिवसाचा बॅनर लावताना कंरट लागुन इसमाचा मृत्यू

जितेंद्र नागदेवते
सिंदेवाही तालुका प्रतिनिधी
मोबाईल 8806689909

सिंदेवाही :- सिंदेवाही पोलीस स्टेशन अंर्तगत येत असलेल्या शहरातील बुलढाणा अर्बन बँकेच्या वरच्या मजल्यावर वाढदिवसाचा बॅनर लावताना कंरट लागुन इसमाचा मृत्यू झाल्याचे घटना काल रात्रौच्या सुमारास घडली.
सविस्तर वृत्त असे की चिमूर विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय आमदार यांचा वाढदिवसानिमित्त आदल्या दिवशी रात्रौ आठ ते नऊ वाजता दरम्यान तीन व्यक्ती बॅनर लावत असताना किशोर प्रेमदास पाटील वय ५०वर्षे रा सिंदेवाही याचा विद्युत ताराला स्पर्श झाला त्यामध्ये तो जखमी झाला त्या अवस्थेत त्याला तात्काळ ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांनंतर उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला झाला.
सदर घटनेची इंद्रजित सोनवणे यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी मर्ग दाखल केला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक कांचन पांडे याच्या देखरेखीखाली पोउपनी विनोद बावने हे करीत आहेत.