- कोरोना प्रादुर्भावामुळे अनेक सण उत्सवावर कोरोनामुळे अटी शर्थी लागू.
(हिरामण गोरेगांवकर ) डोंबिवली मुंबई. सध्या जगभर थैमान घातलेल्या कोरोना मुळे लोक हैराण झाले आहेत अनेकांच्या नोकऱ्या, धंदे, डबघाईला आले आहेत. मागील पाच महिन्यापासून लॉक डाऊन वर लॉक डाऊन होत असल्याने लोकांच्या हाताला कामहि मिळत नाही. आणि अशातच भारतात सणांची काही कमी नाही. अशा अनेक सणांवर कोरोनाचे संकट असल्याने जनमाणसात नाराजीचे सूर उमटत आहेत. अनेक जण चिंतेत आहेत. त्यातच उद्या गोकुळाष्टमी साहजिकच महाराष्ट्राच्या अस्मितेचा खेळाडू वृत्तीचा सण कोरोनामुळे बाळगोपाळामध्येही नाराजी दिसून येत आहे. अनेकजण कोरोना प्रादुर्भाव कमी होण्यासाठी प्रयत्न करत आहेत