नागपूर:- 20 आगस्ट सध्या शेतीचा हंगाम सुरु आहे. त्यामुळे सर्वीकडे शेतामधिल कामे सुरु आहे. विहिरीत पडलेला उंदीर काढण्यासाठी गेलेल्या तीन मजुरांचा विषारी वायूनं गुदमरून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना नागपूरमध्ये घडली आहे.
नागपूर जिल्ह्याच्या मौदा तालुक्यातील वाकेश्वर या ठिकाणी ही घटना घडली. त्यामुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. आकाश पंचबुद्धे (वय 27) विनोद बर्वे (वय 37) आणि गणेश काळबांडे (वय 28) अशी मृतकांची नावे आहेत. तिघेही बद्रीनारायण सपाटे यांच्या शेतात धान पिकांना सल्फेट देण्यासाठी गेले होते. दुपारच्या सुमारास शेतातील विहिरीत उंदीर दिसल्यानं उंदीर काढण्यासाठी एक मजूर विहिरीत उतरला. मात्र, तो बाहेर येत नसल्यानं त्याला काढण्यासाठी दुसरा आणि नंतर तिसरा उतरला. मात्र, विहिरीत असलेल्या विषारी वायूने तिघांचाही गुदमरून मृत्यू झाला. ही बातमी गावात पसरल्यावर गावकरी आणि पोलीस घटनास्थळी पोहचले. तिघांचेही मृतदेह बाहेर काढण्यात आले. ऐन पोळ्याच्या पाडव्याला तीन कुटुंबातील कर्ते पुरुष गेल्यानं कुटुंबासह गावावर शोककळा पसरली आहे. विहिरीतील विषारी वायुमुळं तिघांचा मृत्यू झाला असावा असा प्राथमिक अंदाज आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
Home latest News विहीरीत पडलेला उंदीर काढण्याच्या प्रयत्नात तिन शेतमजूराचा मृत्यू तिघेही मजूर एका...