*10 वर्षे नागपूरात राहिलेला नूर मोहम्मद तालिबान्यांना मिळाला?* *व्हायरल फोटो मुळे पोलिसांचं टेन्शन वाढलं*

*10 वर्षे नागपूरात राहिलेला नूर मोहम्मद तालिबान्यांना मिळाला?*

*व्हायरल फोटो मुळे पोलिसांचं टेन्शन वाढलं*

*10 वर्षे नागपूरात राहिलेला नूर मोहम्मद तालिबान्यांना मिळाला?* *व्हायरल फोटो मुळे पोलिसांचं टेन्शन वाढलं*
*10 वर्षे नागपूरात राहिलेला नूर मोहम्मद तालिबान्यांना मिळाला?*
*व्हायरल फोटो मुळे पोलिसांचं टेन्शन वाढलं*

त्रिशा राऊत
चिमूर तालुका प्रतिनिधी
मिडीया वार्ता न्यूज चंद्रपूर
Mo 9096817953

नागपूर :- अफगाणिस्तान ताब्यात घेतल्यानंतर तालिबानची क्रूरता पुन्हा एकदा दिसू लागली आहे. सध्या जगभरातील देशांच्या नजरा अफगणिस्तानातील घडामोडींवर आहेत. अशात एका व्हायरल फोटोमुळे मोठी चर्चा सुरू झाली आहे. हा व्हायरल फोटो नागपूरचा असल्याचं सांगितलं जात आहे. दोन महिन्यांपूर्वी नागपुरात सापडलेल्या नूर मोहम्मद या अफगाणी नागरिकाच्या हातात बंदू घेतल्याचा फोटो समोर आल्यामुळे टेंशन वाढलं आहे.
कोण आहे नूर मोहम्मद
दोन महिन्यांपूर्वी नागपूर पोलिसांनी नूर मोहम्मद या अफगाणी नागरिकाला ताब्यात घेतलं होतं. तो अवैध कागदपत्र आणि पासपोर्टच्या आधारे भारतात आल्याचं उघड झालं होतं. यानंतर नागपूर पोलिसांनी अफगणिस्तानच्या दूतावासाशी संपर्क साधत त्याची ओळख पटवून त्याला परत अफगणिस्तानला रवाना केला. मात्र तो अफगणिस्तानला पोहोचल्यानंतर त्याचा बंदूक हातात घेतलेला फोटो पाहून नागपूर पोलिसांना धक्काच बसला. त्याला अफगणिस्तानमध्ये पाठवल्यानंतर तो तालिबान्यांशी जाऊन मिळाला अशी चर्चा सध्या सुरू आहे. धक्कादायक बाब म्हणजे बनावट कायद्यांच्या आधारे गेल्या 10 वर्षांपासून तो नागपुरात राहत होता.
काय म्हणाले पोलीस..
दरम्यान व्हायरल होणारा फोटो हा नूर मोहम्मदचाच आहे, याची सत्यता पडताळण्यात आलेली नाही. त्यामुळे हा फोटो त्याचाच आहे असं सांगणं जरा अवघड आहे. हा फोटो सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हायरल होत असल्यामुळे कोणतीही खात्रीलायक माहिती दिली जाऊ शकत नाही.
मात्र जर तो फोटो नूर मोहम्मदचाच असला तर मात्र नागपूर पोलिसांना डोकेदुखी ठरू शकते. तो गेली 10 वर्षे येथे का राहत होता, येथे राहून तो नेमका काय काम करीत होता याबाबत नेमकी माहिती सांगू शकत नाही.