आमदार मेघेंनी केले विविध विकास कामांचे भूमिपूजन!

आमदार मेघेंनी केले विविध विकास कामांचे भूमिपूजन!

आमदार मेघेंनी केले विविध विकास कामांचे भूमिपूजन!
आमदार मेघेंनी केले विविध विकास कामांचे भूमिपूजन!

हिंगणा तालुका जिल्हा नागपूर
देवेंद्र सिरसाट
9822917104

जिल्हा वार्षीक योजना अंतर्गत मंजुर कामे आणि केंद्र शासनाच्या रूरबन योजनेतून करण्यात आलेल्या सुमारे रू. 2.20 कोटी किंमतीच्या कामांची भूमीपूजन व लोकार्पण कार्यक्रम आमदार समीर मेघे यांचे हस्ते दिनांक 19.08.2021 रोजी सपन्न झाला. त्यात प्रामख्याने मौजा किरमीटी येथील सार्वजनीक जागेस संरक्षण भिंत कामाचे भूमीपूजन, तुरकमारी जोड रस्ता, देवळी (निस्ताने) जोड रस्ता या कामांचे लोकार्पण तर कान्होलीबारा येथील ग्रामपंचायतींना नागरी सुविधांसाठी अर्थसहाय्य या योजनेतून रू. 50 लक्ष किंमतीच्या विविध कामांची भूमीपूजन करण्यात आले. तसेच खापरी (गांधी) व कान्होलीबारा या गावांमध्ये रूरबन योजनेतून बांधकामे करण्यात आलेल्या बचत गटांसाठी पोल्ट्री विक्री केंद्र-दुकान गाळे, गोडावून बांधकामे, बचत गटांसाठी प्रशिक्षण केंद्र इमारत व बचत गटांकरिता कृषी उत्पन्न बाजार केंद्र या रू. 74 लक्ष किमतींच्या इमारतींची बांधकामे पूर्ण करण्यात आलेली आहे. या इमारतींचा वापर सुरू करण्यास्तव लोकार्पण करण्यात आले. याप्रसंगी जि.प. सदस्य श्री आतिष उमरे, पं.स. सदस्य संजय ढोडरे, सरपंच सौ. रोशनी उमरे, प स सदस्य साक्षी विनोद गायकवाड, हरीशचंद्र अवचट, श्रावणजी जूनघरे, सरपंच जितेंद्र बोटरे, प्रशांत पाटील, सुर्वणाताई खोबे, विकास दाभेकर, गजेंद्र खोबे,किशोर गंधारे,पवन गायकवाड, सर्व उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, व गावकरी उपस्थित होते.