जिल्हा परिषद ,पंचायत समितीवर जनसेवा गोंडवाना पार्टीचा स्वबळावर झेंडा फडकणार, प्रा.धिरज सेडमाके

56

जिल्हा परिषद निवडणूक जनसेवा गोंडवाना पार्टी स्वबळावर लढणार, प्रा.धिरज सेडमाके प्रदेश अध्यक्ष जनसेवा गोंडवाना पार्टी, जिल्हा परिषद ,पंचायत समितीवर जनसेवा गोंडवाना पार्टीचा झेंडा फडकणार

तारा आत्राम

चंद्रपूर उपजिल्हा प्रतिनिधी

 मो:95116 20282

चंद्रपूर:जनसेवा गोंडवाना पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. अवचितरावजी सयाम साहेब यांच्या आदेशानुसार, चंद्रपुर जिल्ह्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूका अनुषंगाने जनसेवा गोंडवाना पार्टी चंद्रपुर शाखेच्या वतीने दिनांक 31/07/2022ला शासकीय विश्रामगृह चंद्रपूर येथे आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले…

आगामी होऊ घातलेल्या चंद्रपूर जिल्हा परिषदेच्या 62 जागांवर जनसेवा गोंडवाना पार्टी सक्षम उमेदवार देणार  

बैठकीला प्रा.धिरज सेडमाके प्रदेशाध्यक्ष म.रा, बंडू मडावी अध्यक्ष चंद्रपुर लोकसभा, विनोद शेंडे चंद्रपूर लोकसभा संघटक, जोतीताई पेंदोर महिला चंद्रपुर जिल्हाध्यक्ष, अनिताताई पेंदोर महिला चंद्रपूर उपाध्यक्ष, सोनालीताई आत्राम महिला चंद्रपूर शहर अध्यक्ष, प्रल्हाद उईके सिंदेवाही तालुका अध्यक्ष, शांताराम कुडसंगे कोरपना तालुका अध्यक्ष, निलेश कुमरे वरोरा तालुका अध्यक्ष, सुदर्शन आत्राम राजुरा तालुका अध्यक्ष, अनिल सिडाम राजुरा विधानसभा संघटक, मधुकर मडपती कोरपना तालुका उपाध्यक्ष, गणेश कुळसंगे जिल्हा उपाध्यक्ष, सतीश सोयाम शहर अध्यक्ष, करण मडावी शहर संघटक, रंजित येरकाडे शहर उपाध्यक्ष, राजू मडावी चंद्रपूर तालुका संघटक, कार्तिक पेंदाम शहर महामंत्री, मिथुन मसराम जिल्हा प्रसिद्धि प्रमुख, जगदिश परचाके शहर प्रसिद्धी प्रमुख, शांताराम इटकेलवार, राजू कन्नाके यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. आढावा बैठकीच्या अध्यक्षीय मनोगतात प्रा.धिरज सेडमाके यांनी म्हटले की आगामी होणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक जनसेवा गोंडवाना पार्टी पूर्ण ताकतीने लढेल, जिल्हा परिषद च्या 62 सीठा तसेच पंचायत समितीच्या 124 सीठा जनसेवा गोंडवाना पार्टी पूर्ण ताकतीने लढेल, जनसेवा गोंडवाना पार्टीच्या आढावा बैठकीत जिल्हा परिषदेच्या 16 सिटांनवर उमेदवार ठरवण्यात आले. पंचायत समितीच्या 32 सिटांनवर उमेदवार ठरवण्यात आले.

उमेदवाराच्या पाठीशी जनसेवा गोंडवाना पार्टी खंभीर पणे उभी राहिल, उमेदवाराला निवडून आणण्यासाठी परिपूर्ण प्रयत्न करेल, ज्या उमेदवारांना जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक लढायची असेल त्या उमेदवारानी जनसेवा गोंडवाना पार्टीकडे संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले. जनसेवा गोंडवाना पार्टीचा झेंडा जिल्हा परिषद, पंचायत समिती वर फडकलाच पाहिजे या साठी प्रत्येक तालुक्यातील पदाधिकारी कार्यकर्त्यांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे .पुढे म्हटले की जनसेवा गोंडवाना पार्टी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक स्वबळावर लढेल, समविचारी पक्ष सोबत येत असेल तर युती करण्यास जनसेवा गोंडवाना पार्टी विचार करेल बैठकीला प्रत्येक तालुक्यातील पदाधिकारी कार्यकर्त्याची उपस्थिती होत.