ग्रामसभांनी वन हक्काची व रोजगार हमी योजनेची प्रभावी अंमलबजावणी करावी: गुणवंत वैद्य. समाज प्रगती सहयोग व रिवार्ड्स संस्थेचा नाविन्यपुर्ण प्रकल्प

अरुण रामुजी भोले

नागभिड तालुका प्रतिनिधी

9403321731

नागभीड: वनहक्क प्राप्त ग्रामसभानी वन हक्कची प्रभावी अंमलबजावणी करावी तसेच रोजगार हमी योजनेची योग्य कार्यवाही करुन लोकाना जास्तीत जास्त योजगार उपलब्ध करावा असे प्रतिपादन गुणवंत वैद्य यांनी केले ते समाज प्रगती सहयोग (मध्य प्रदेश) आणि रीवार्ड्स मल्टीपरपज सोसायटी नागभीड यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित ग्राम पंचायत प्रतिनिधी च्या प्रशिक्षण कार्यशाळेत बोलत होते. 

 ‘कृषीवर निर्भर कुटुंबाची आजिवीका विकास प्रकल्प’ नागभीड तालुक्यातील 30 गावांमध्ये जुलै 2022 पासून सुरु करण्यात आला आहे. त्यासाठी ग्रामपंचायत सरपंच आणि सदस्यांना योग्य मार्गदर्शन मिळावे म्हणून 17 जूलै 2022 ला नागभीड येथे प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. सरपंच व सदस्यांना मार्गदर्शन करताना रिवार्ड्सचे संस्थापक अध्यक्ष गुणवंत वैद्य त्यांनी सांगितले की 2017—18 मध्ये तालुक्यातील काही गावांना सामूहिक वनहक्क प्राप्त झाले आहे. परंतु अजूनही बहुतांश गावांमध्ये सामूहिक वनहक्क व्यवस्थापन समिती स्थापन झालेल्या नाहीत. परिणामी योग्य मार्गदर्शनच्या अभावामुळे ग्राम स्तरावर वनहक्काची अंमलबजावणी होऊ शकली नाही .यासाठी योग्य मार्गदर्शनाची आवश्यकता आहे. लोकांना रोजगार देण्यासाठी रोजगार हमी आणि वनहक्काची अंमलबजावणी करावी असे गुणवंत वैद्य यांनी सांगितले .त्यानंतर रुपचंदजी दखणे ,अध्यक्ष ग्राम आरोग्य संस्था घाटी कुरखेडा यांनी वन हक्काबद्दल कायदा समजून सांगितला .या कार्यक्रमाचे संचालन भोजराज नवघडे यांनी तर आभार प्रदर्शन कैलास नन्नावरे यांनी केले. कार्यक्रम यशस्वीते साठी लीना शेंडे यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमाला अर्चना ठाकरे सरपंच देवपायली , केशवराव जांभुळे कोरंबी, सुनीताताई गाठे तसेच 30 गावातील 40 प्रतिनिधि यात सरपंच, सदस्य ,सामूहिक वन व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, सदस्य ,सचिव ,बहुस्खेनी उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here