देहव्यापाराचा हा गोरखधंदा आई आणि मुलला केली अटक तर २७ वर्षीय एका युवतीची सुटका केली.
त्रिशा राऊत नागपूर क्राईम रिपोटर मो.9096817953
नागपूर.नागपूर शहराच्या हुडकेश्वर भागात घडलेली अलीकडील घटना नागपूरकरांसाठी हादरवून सोडणारी ठरली आहे. कारण, अनेकदा अशा रॅकेट्सच्या मागे बाहेरील टोळ्या किंवा संघटित गुन्हेगारी मंडळी असल्याचे आढळत असे.मात्र यावेळी देहव्यापाराचा हा गोरखधंदा आई आणि मुलगा यांनीच एकत्र येऊन रचला होता.
नागपूर क्राइम ब्रांचच्या सामाजिक सुरक्षा विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सुनीता विकास कांबले (वय ४६) आणि तिचा मुलगा यश विकास कांबले (वय २६) यांनी हुडकेश्वर येथील संत ताजेश्वर नगरात एक फ्लॅट भाड्याने घेतला होता. बाहेरून ते आरटीओ दलालीचे काम करतात, असं सांगायचे. मात्र, प्रत्यक्षात त्या घरातून मागील सहा महिन्यांपासून देहव्यापार चालवला जात होता..
या धक्कादायक कारवाईदरम्यान पोलिसांनी छत्तीसगडमधील २७ वर्षीय एका युवतीची सुटका केली. पैशांचे आमिष दाखवून तिला नागपूरात आणण्यात आलं होतं. तपासात उघड झालं की आरोपी प्रीमियम ग्राहकांनाच लक्ष्य करत होते. व्हाट्सअपवर मुलींचे फोटो पाठवून ग्राहकांशी व्यवहार निश्चित केला जात होता. पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवून केवळ हजार रुपयांत सौदा ठरवला आणि त्यानंतर छापा मारत आई आणि मुलाला रंगेहात अटक केली.
घटनेतील सर्वात संतापजनक बाब म्हणजे आईच स्वतःच्या मुलासोबत अशा घृणास्पद कृत्यात सहभागी झाली होती. समाजातील नैतिक मूल्यांचा झालेला ऱ्हास आणि पैशांसाठी माणुसकीचा कसा बळी दिला जातो, याचं हे ज्वलंत उदाहरण आहे. नागरिकांना अपेक्षा असते की घर हे सुरक्षित ठिकाण असावं. परंतु येथे आई-मुलगा एकत्र येऊन गुन्हा रचतात, हे अत्यंत चिंताजनक आहे. पोलिसांनी पीटा कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.
नागपूरसारख्या शहरात कुटुंबीयच अशा गोरखधंद्यात उतरतात, ही बाब समाजाला आत्मपरीक्षणाचा इशारा देणारी आहे. आता पोलिसांनी फक्त दोन आरोपींवर कारवाई करून थांबू नये, तर या प्रकरणाच्या मुळाशी जाऊन संपूर्ण रॅकेट उद्ध्वस्त करणे गरजेचं आहे.
बांग्लादेशी नागरिकाविरोधात गुन्हा दाखल
बांगलादेशी नागरिकाने बनावट दस्तऐवजाआधारे भारतीय पासपोर्ट बनवून नागपुरात वास्तव केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी गिट्टीखदान पोलिसांनी बांगलादेशी नागरिकाविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.