श्रीमंतांसाठी भिंत, सामान्यांसाठी मृत्यू”

“श्रीमंतांसाठी भिंत, सामान्यांसाठी मृत्यू”

दरडप्रणव क्षेत्रात समावेश नसताना भोइघर येथे 5 कोटीची संरक्षक भिंत,

मिठेखारच्या येथे संरक्षक भिंत बांधण्याच्या दुर्लक्षामुळे गरिब महिलेचा बळी.

अँड.रत्नाकर पाटील
रायगड ब्यूरो चीफ
९४२०३२५९९३

अलिबाग:- दरडप्रणव क्षेत्रात समावेश नसताना मुरूड तालुयातील भोइघर येथे संरक्षक भिंतींचे सुमारे 5 कोटींचे काम केवळ धनदांडग्यांच्या मालमत्तांच्या रक्षणासाठी केले गेले आहे परंतू दूसरीकडे, तालुक्यातीलच मिठेखार गावामध्ये ग्रामस्थांच्या वारंवार मागणीनंतरही येथे संरक्षक भिंत उभारली गेली नाही, शेवटी या ठिकाणी दरड कोसळून एका वृध्द महिलेचा नाहक बळी गेला अशी टिका माहिती अधिकार कार्यकर्ते संजय सावंत यांनी केली आहे.
दरडीसारख्या नैसर्गीक आपत्तींपासून नागरिकांचे संरक्षण व्हावे यासाठी शासन संरक्षक भिंतींची कामे करीत असते, मात्र दरडप्रणव क्षेत्रात भोईघरचा समावेश नाही. भोईघर येथील विलोभनीय समुद्र किर्नायाच्या पार्श्वभुमीवर धनदांडग्यांनी त्यांच्या मालमत्ता खरेदी केल्या आहेत. यामध्ये काही लोकप्रतिनीधींच्या नातेवाईकांचाही समावेश आहे. त्यांच्या मालमत्तांच्यारक्षणासाठी शासनाने तत्परतदेने 5 कोटीची संरक्षक भिंत का बांधली आहे असा सवाल सावंत यांनी केला आहे.
मुरूड तालुक्यातील भोइघर किनारपट्टीवर संरक्षक भिंतींचे तब्बल 5 कोटी रुपयांचे काम झाले. मात्र हे काम स्थानिक धनदांडग्यांच्या मालमत्तांच्या रक्षणासाठी केल्याच्या आरोपांनी ग्रामस्थांत संताप उसळला आहे. दूसरीकडे, तालुक्यातीलच मिठेखार गावामध्ये दरड कोसळून दुर्दैवाने एका महिलेला जीव गमवावा लागला आहे.. आणि ग्रामस्थांच्या वारंवार मागणीनंतरही येथे संरक्षक भिंत उभारली गेली नाही, याकडे गंभीर दुर्लक्ष झाल्याचे स्पष्ट झाले.
भोइघर भागातील किनारी संरक्षणासाठी शासनाने कोट्यवधी रुपये मंजूर केले. मात्र किनारपट्टीवरून खरोखर लोकांचे प्राण आणि उपजीविका धोक्यात असलेल्या भागांकडे लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाने दुर्लक्ष केले. परिणामी, मिठेखार येथे निसर्गकोपाचा बळी एका गरीब कुटूंबाला दयावा लागला आहे. या घटनेमुळे मृत महिलेच्या कुटुंबावर शोककळा पसरली असून गावकरी आक्रोश व्यक्त करत आहेत.
“धनाढ्यांच्या बंगल्यांसाठी संरक्षक भिंत उभारली जाते, पण सामान्यांच्या जिवासाठी का नाही?”
सावंत यांनी तातडीने मिठेखार परिसरात संरक्षक भिंतीचे काम हाती घेण्याची मागणी केली आहे. “वारंवार निवेदन दिले, आंदोलने केली; तरी सरकार आणि लोकप्रतिनिधी बहिऱ्या कानांनी ऐकत राहिले. त्याचा परिणाम म्हणजे आज एका मायेला प्राण गमवावे लागले,” या घटनेमुळे लोकप्रतिनिधी आणि शासन यांच्यावर तीव्र टीका होत आहे. सामान्यांसाठी न्याय्य धोरण राबवून धोरणात्मक कामे केली पाहिजेत, अन्यथा ग्रामस्थांच्या तीब्र रोषाला सामोर जावे लागेल असा इशाराही सावंत यांनी दिला आहे.